Kidney
Kidney Sakal
पुणे

पुण्यातील 'रुबी रुग्णालय रॅकेट' प्रकरणात ट्विस्ट, मध्यस्थांचीही एक किडनी गायब

योगिराज प्रभुणे

मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणात मध्यस्थी म्हणून अटक केलेल्या दोघांनाही एक-एक मूत्रपिंड नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पुणे - मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणात मध्यस्थी म्हणून अटक केलेल्या दोघांनाही एक-एक मूत्रपिंड नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांनीही यापूर्वी पैशांसाठी मूत्रपिंड दिल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आणखी कलाटणी मिळाली आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्यानंतर पैसे दिले नाही, असा खळबळजनक आरोप सारीका गंगाराम सुतार यांनी केला. त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे डॉ. संजोग सीताराम कदम यांनी याविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यात पैशाच्या आमिषाने मूत्रपिंड देणाऱ्या महिलेसह मध्यस्थी आणि रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या अभिजित गटणे आणि रवींद्र रोडगे यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची तपासणी करताना दोघांच्याही शरीरावर कंबरेच्या बाजूला शस्त्रक्रियेचे व्रण दिसले. ‘हे व्रण कसले आहेत,’ असा प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला. त्यातून दोघांनीही यापूर्वीच मूत्रपिंड दिल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.

सोनोग्राफी रिपोर्ट काय सांगतो?

अभिजित गटणे आणि रवींद्र रोडगे या दोन्ही आरोपींच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे व्रण दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांची सोनोग्राफी केली. या सोनोग्राफीत दोन्ही आरोपींना एकच मूत्रपिंड असल्याचे दिसते. त्यामुळे आरोपींनी दिलेल्या माहितीला वैद्यकीय दुजोरा मिळाला आहे.

तपासातील आव्हान वाढले

या प्रकरणात दोन्ही मध्यस्थांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी त्यांची मूत्रपिंडे याच पद्धतीने दिल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यामुळे या तपासातील आव्हान आणखी वाढले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या मध्यस्थांपर्यंत आणखी कोणीतरी पोचले होते. तसेच, हे मध्यस्थही किती जणांपर्यंत पोचले असतील, याची उकल पोलिस करत आहेत.

मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात दोन्ही आरोपींच्या शरीरात प्रत्येकी एक-एक मूत्रपिंड आहे. दोनपैकी एक मूत्रपिंड नसल्याचे सोनोग्राफीतूनही निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने आता पुढे तपास सुरू करण्यात आला आहे.

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन, पुणे पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT