प्रदीप गारटकर sakal
पुणे

Pune : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जिंकणार- गारटकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आणि हवेली तालुका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आढावा बैठक

सकाळ डिजिटल टीम

उंड्री : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर न्यायालयाने निकाल दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आणि हवेली तालुका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आढावा बैठक हांडवाडी (ता. हवेली) येथे झाली. याप्रसंगी आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पीडीसीसीचे संचालक सुरेश घुले, विकास दांगट, राजेंद्र खांदवे, माणिक गोते, हवेलीचे माजी उपसभापती सचिन घुले उपस्थित होते.

दरम्यान, आमदार अशोक पवार म्हणाले की, शिरुर, पुरंदर, हवेली तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक जिंकणारच. तिन्ही तालुक्यात १४० विविध विकास कार्यकारी सोसायट्या असून, त्यातील ९० टक्के सोसायट्यांवर राष्ट्रवादी व मविआचे वर्चस्व आहे, असे त्यांनी सांगितले.भरत झांबरे, दिलीप वाल्हेकर, त्रिबंक मोकाशी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT