पुणे

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी साडेसात हजार जागांची वाढ

CD

पुणे, ता. ११ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तीन आणि पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीपर्यंतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १४) आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी येत्या सोमवारपर्यंत (ता. १७) नवीन साडेसात हजारांहून अधिक जागा वाटप जाहीर करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेत आता १३० महाविद्यालयांची भर पडली असून त्याद्वारे सात हजार ६२० नवीन जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्राधान्यक्रम भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी ३३ हजार २०३ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. यात तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी २३ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी, तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी नऊ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत.

यावेळी राज्यात तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी ९३ महाविद्यालये आणि १० हजार १०५ जागा उपलब्ध होत्या. आजपर्यंत यामध्ये ७० महाविद्यालयांची वाढ झाली असून आतापर्यंत एकूण १६३ महाविद्यालये झाली असून चार हजार ७१० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांची संख्या आता १४ हजार ८१५ झाली आहे. तर, पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ५६ महाविद्यालये आणि पाच हजार ९५५ जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत यामध्ये ६० महाविद्यालयांची वाढ झाली आहे. आता एकूण ११६ महाविद्यालये झाली असून दोन हजार ९१० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. प्रवेशासाठी एकूण उपलब्ध नवीन जागांची संख्या आता आठ हजार ८६५ झाली आहे. दोन्ही अभ्यासक्रम मिळून आतापर्यंत एकूण १३० महाविद्यालयांची भर पडली असून राज्यात एकूण २७९ महाविद्यालये प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये सात हजार ६२० नवीन जागा उपलब्ध झाल्या आहेत. प्रवेशासाठी एकूण २३ हजार ६८० जागा उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT