crime sakal
पुणे

मंचर : जादू दाखवितो सांगून मोबाईलच पळविला

तुम्हाला जादू दाखवतो,’ असे म्हणून खडा घेऊन यायला सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मंचर : येथील बसस्थानकासमोर, ‘मी पंडित आहे, तुम्हाला जादू दाखवतो,’ असे सांगून हातचलाखी करून ११ हजार ८०० रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळून जाताना मंचर पोलिसांनी पाठलाग करून जावेद अगाजित मदारी (वय १९, रा. इस्लामपुरा, ता. शिरूर) व शाहरुख मदारी या दोन चोरट्यांना पकडले.

याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी माहिती दिली की, अक्षय लांघी (रा. आहुपे ता. आंबेगाव) हे त्यांच्या मित्राबरोबर चाकण येथून मंचर येथे आले होते. बसस्थानकावर त्यांना दोन जण भेटले. त्यांनी, ‘आम्ही पंडित आहे. तुम्हाला जादू दाखवतो,’ असे म्हणून खडा घेऊन यायला सांगितले.

त्यानुसार लांघी यांनी खडा आणून दिला. मात्र, अजित व शाहरुख या दोघांनी हातचलाखी करून अक्षय यांचा मोबाईल काढून घेतला. ‘तू जर ऐकले नाही तर तुझ्या घरच्यांचे बरे वाईट होईल,’ अशी दमाची भाषाही वापरली. त्यानंतर अक्षय यांच्या पिशवीमध्ये मोबाईल टाकल्याचा बहाणा करत ते तेथून निघून गेले. अक्षय यांनी पिशवीत पाहिले असता मोबाईल दिसला नाही. अक्षय यांनी आजूबाजूला पाहिले. त्यावेळी अजित व शाहरुख पळताना दिसले. अक्षय व त्याचा मित्राने वाहतूक पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही चोरट्यांना जेरबंद केले आहे. याबाबत अक्षय लांघी यांनी मंचर पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT