Ajit Pawar  sakal
पुणे

पुणे : विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे कौशल्य दिसेल ;अजित पवार

निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते

राजेश नागरे

माळेगाव : `` विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. विशेषतः याआगोदरही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र आले होते. प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे. निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असे म्हटले जाते.

विधान परिषद निवडणुकीनंतर कळेल कोणाकडे कौशल्य आहे आणि कोणाकडे काय आहे ते. महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्र केले जात असून अपक्ष आमदारांशीही संपर्क साधण्यात येतोय. या निवडणूकीत आमचे कौशल्य दिसून येईल,`` असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती येथे सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्धाटन कार्य़क्रमाच्या निमित्ताने आले असता पवार पत्रकारांशी बोलत होते. देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आपणास बोलण्याची संधी दिली नाही, असे विचारले असता पवार म्हणाले, `` देहु मधील कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही.

हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान दिल्लीत पोहचले. देहूत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमाला आले होते, याचे सर्वांना समाधान आहे.`` विखे पाटलांनी अजित पवारांना भाजपसोबत येण्याचे आमंत्रण दिले आहे याबाबत पवार म्हणाले, की आमचे इथे बरे चाललेय. कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ``ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेणार आहोत. काही नावे ही सर्व जातींमधे आढळतात. नावांवरून ओबीसी ठरवता येणार नाही,`` असे मत अजित पवार यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT