march sakal
पुणे

Animal husbandry March : पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये अनेक पदे कमी करून अधिकाऱ्यांची पदे वाढविण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये अनेक पदे कमी करून अधिकाऱ्यांची पदे वाढविण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

पुणे - पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये अनेक पदे कमी करून अधिकाऱ्यांची पदे वाढविण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा अन्यायकारक प्रस्तावित आकृतिबंध मंजूर करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवून गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील सध्याची मंजूर पदे कायम ठेवावीत, या मागणीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघाचे अध्यक्ष अंकुश शेजाळ यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधामध्ये सुधारणा करून तो अंतिम करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. सुधारित आकृतिबंधामध्ये वर्ग-३ व वर्ग-४ वर्गातील पदे मोठ्या प्रमाणात कमी करुन वर्ग-१ आणि २ मधील अधिकाऱ्याची पदे वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब पशुसंवर्धन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी भविष्यामध्ये धोकादायक ठरणार आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघटनेने पशुसंवर्धन आयुक्तांना निवेदनाद्वारे प्रस्तावित आकृतिबंधामध्ये कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्यात येवू नयेत, अशी मागणी केली आहे. त्यानंतर प्रधान सचिव यांच्याकडेही निवेदन दिले आहे. परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी पशुसंवर्धन विभागाने हा अन्यायकारक आकृतिबंध सरकारच्या मंजुरीस्तव सादर केला आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २५ नोव्हेंबरला मुंबई येथे मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

असहकार आंदोलन करणार

पशुसंवर्धन विभागाच्या हितासाठी पुरेशा पदसंख्येचा आकृतिबंध तयार करण्यात यावा. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास सोमवार (ता. २८) पासून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व सरकारी कामकाज (अत्यावश्यक व लम्पी आप्पतीजनक कामकाज वगळून) पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येईल, असे संघटनेने महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT