पुणे

मार्केट यार्डातील उलाढालीला फटका 

सकाळवृत्तसेवा

पुणे - माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाचा मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला असून, पाच ते सहा दिवस पुरवठा होईल इतकेच धान्य बाजारात आहे. भाजीपाला आवकेवर विशेष परिणाम झालेला नाही. 

गेल्या सहा दिवसांपासून माल वाहतूकदारांचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा किराणा भुसार मालाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाजारातील आवक तुलनेने अत्यल्प असून, ती थांबल्यासारखीच झाली आहे. यापूर्वी व्यापाऱ्यांनी मागविलेला आणि साठविलेला माल शिल्लक असून, त्यालाही तुलनेत मागणी कमी आहे. इतर जिल्ह्यांतून होणारी खरेदी थांबली असून, बाजारात आणखी काही दिवसच पुरवठा केला जाऊ शकतो इतके धान्य, डाळी आदी माल शिल्लक आहे. भाजीपाला विभागातील आवक टिकून असल्याचे पुणे-हवेली तालुका बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी भाजीपाला विभागात साधारणपणे 70 ते 80 ट्रक इतकी आवक झाल्याचे नमूद केले. 

भाजीपाला बाजारात आवक नियमित असली, तरी परराज्यांतून होणारी बटाटा, लसूण यांच्या आवकेवर थोडा परिणाम झाला आहे. मात्र, मागणीइतकी आवक होत असल्याने तुटवडा नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पुण्यातून कांदा आणि डाळिंब आदी मालाची परराज्यांतील जावक थांबल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले..

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT