Market yard March sakal
पुणे

Pune Market Yard : ॲट्रॉसिटी, विनयभंगाचे खोटे गुन्हे मागे घ्या; मार्केट यार्डातील बाजार घटकांचा मुक मोर्चा

गुन्हे रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन मार्केट यार्ड येथील जय शारदा गजानन मंदिर ते मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

गुन्हे रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन मार्केट यार्ड येथील जय शारदा गजानन मंदिर ते मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधील बेकायदेशिर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बाजारातील विविध संघटनांनी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन निषेध व्यक्त करत मुक मोर्चा काढला. यावेळी सर्व संघटनांच्या वतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला निवदेन देण्यात आले.

गुन्हे रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.१७) काळे कपडे घालुन मार्केट यार्ड येथील जय शारदा गजानन मंदिर ते मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी अडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरूद्ध (बापू) भोसले, ज्येष्ठ अडते गणेश घुले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव करण जाधव, युवराज काची, राहुल कोंढरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, कामगार संघटनेचे विशाल केकाने, संतोष नांगरे, नितीन जामगे, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाजारातून लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. ही अन्यायकारक गोष्ट आहे. भविष्यात खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मार्केट यार्डात विविध संघटनाच्या वतीने करण्यात आले.

गुरुवारी मार्केट बंद

बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, अडते यांच्यावर दाखल झालेले खोटे ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी सोमवारी मुक मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर गुरूवारी (ता.२०) एक दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच बाजारातील अडते, टेम्पो, कामगार, तोलणार संघटनेसह विविध संघटनानीदेखील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

- गणेश घुले, जेष्ठ अडते, मार्केट यार्ड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Job: महिला शक्तीला बळ देण्यासाठी 'या' सरकारी बँकेचा पुढाकार; फक्त महिलांसाठी भरती प्रक्रिया राबवणार

IND vs WI, 2nd Test: शुभमन गिल पळत आला अन् सूर मारत चंद्रपॉलचा अफलातून कॅच पकडला, Video एकदा पाहा

Share Market: ५ दिवस... ४५,००० कोटी रुपयांची कमाई, 'या' कंपनीने दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिला सर्वाधिक फायदा

CM Devendra Fadnavis: युतीतील घटक पक्षांवर टीका टाळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; साताऱ्यातील दोन्ही आघाडीबाबत नेमकं काय म्हणाले?

आलू से सोना तो नहीं बनाते, शेतकऱ्याची मिश्किल टिप्पणी; PM मोदी म्हणाले, हे जैनांसाठी...

SCROLL FOR NEXT