Pune Metro introduces a new timetable from 15 August, reducing peak-hour train intervals to six minutes for faster and smoother travel.  sakal
पुणे

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Pune Metro to run every six minutes during peak hours from 15 August: पुणेकरांची मेट्रो ट्रेनमधील गर्दीपासून होणार सुटका; जाणून घ्या, अधिकची माहिती

Mayur Ratnaparkhe

Pune Metro Increases Frequency from 15 August : पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सध्या गर्दीच्या वेळेत म्हणजेच ९ ते ११ आणि  ४ ते ८ या कालावधीत दर सात मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे सेवा उपलब्ध आहे. मात्र आता येत्या १५ ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर सहा मिनिटाला प्रवाशांना सेवा देणार आहे. तर विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.

सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून ४९० फेऱ्यांद्वारे मेट्रो सेवा पुरवत आहे. दर सहा मिनिटाला ट्रेन सेवा  यामुळे अधिक ट्रेनच्या ६४ फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे १५ ऑगस्टपासून एकूण ५५४ फेऱ्या होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

जुलै मध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून,  दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९२ हजारांपर्यंत वाढली आहे. तसेच ऑगस्टमध्येही प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आजपर्यंत प्रवाशांची सरासरी संख्या २,१३,६२० निदर्शनास आली आहे.

पुणे महापालिकेसह पुणे महानगर प्रदेशच्या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने ३१२ किलोमीटर लांबीची मेट्रो आणि त्यात ८० किलोमीटर नवीन बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्ग, ४६ किलोमीटर बस मार्ग, बारा टर्मिनलचा पुनर्विकास, १९ नवीन उड्डाण पूल असे सुमारे १ लाख ३३ हजार ५३५ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी ‘पीएमआरडीए’ने एल अँड टी कंपनीच्या मदतीने ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार केला होता. तो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) सुधारित करत त्यात या शिफारशी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : 'मत चोरी'सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी विधाने करू नका; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

Independence Day Solo Travelling Tips : स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलो ट्रॅव्हलिंग करताय? मग या सेफ्टी टिप्स तरुणींनी लक्षात ठेवाल्याच पाहिजेत

Karad Crime: 'रेल्वेतील चोरीप्रकरणी दोघे अल्पवयीन ताब्यात'; संशयितांकडून पावणेचार लाखांचे दागिने जप्त

Online Car Booking: कुटुंबासह सैर करायचीयं, पण कार नाहीय? 'या' वेबसाईटवरून सहज बुक करा कार

Latest Marathi News Updates : सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार

SCROLL FOR NEXT