pune metro start from wednesday schedule time vanaz to ruby hall pimpri chinchwad to civil court Sakal
पुणे

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रोला उदंड प्रतिसाद! आता वनाज ते रुबी हॉल फेऱ्यांसाठी एक तास वाढवला

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! मेट्रो बुधवारपासून सकाळी ६ ते रात्री १० धावणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील वनाज स्थानक ते रूबी हॉल क्लिनिक मार्गावरील मेट्रो आता सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सुरू राहणार आहे. बुधवारपासून (ता. १७) या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने सकाळी १ तास लवकर मेट्रो सुरू करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते शिवाजीनगर न्यायालय स्थानक दरम्यानच्या मेट्रो मार्गावरील वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी ७ ते रात्री १० अशीच सुरू असणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

पुणे मेट्रोची वारंवारता पुढीलप्रमाणे असेल

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग

सकाळी ६ ते ८ - दर १५ मिनिटांनी

सकाळी ८ ते ११ - दर १० मिनिटांनी

सकाळी ११ ते दुपारी ४ - दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ - दर १० मिनिटांनी

रात्री ८ ते १० - दर १५ मिनिटांनी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग

सकाळी ७ ते ८ - दर १५ मिनिटांनी

सकाळी ८ ते ११ - दर १० मिनिटांनी

सकाळी ११ ते दुपारी ४ - दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ - दर १० मिनिटांनी

रात्री ८ ते १० - दर १५ मिनिटांनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Sports News: टी-२० विश्वकरंडक विजेत्या संजू सॅमसनला ICC पुरस्कार; मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

SCROLL FOR NEXT