अन्न व औषध प्रशासन sakal
पुणे

पुणे : दिवाळीत अन्नपदार्थामध्ये भेसळ, अन्न व औषध प्रशासनाचे छापे

६१ लाखांहून अधिक अन्नपदार्थांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अन्नपदार्थामध्ये भेसळ केल्याप्रकरणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, पनीर, गूळ यासह इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दिवाळीत अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. ही बाब लक्षात घेउन अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. भेसळीच्या संशयावरून विविध अन्न पदार्थाच्या धाडी घालून जप्तीची कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यात ३३ लाख ५१ हजार रुपये किमतीचा साठा तर, विभागातील इतर जिल्ह्यांत २७ लाख ५५ हजार रुपये असा एकूण ६१ लाखांहून अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात खवा, खाद्यतेल, पनीर व इतर अन्न पदार्थाचे ४६ नमुने आणि इतर जिल्ह्यांत ४१ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात भेसळयुक्त खवा, खाद्यतेल, दलिया, सुजी, रवा, पोहे, चनाडाळ, मिरची पावडर, व्हाइट पावडर, स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २१ लाख ७९ हजार रुपये इतकी आहे. सांगलीमध्ये सव्वाचार लाख रुपये किमतीचा खाद्यतेल आणि खवा जप्त केला. सोलापूर जिल्ह्यात चहा पावडरसह इतर अन्नपदार्थांचा दीड लाखांचा साठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत संशय आल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT