Dhara 2023 Sakal
पुणे

Mula Mutha River : मुळामुठेच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना

मुळा मुठा नदीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा कलमी उपायजोना मांडली असून, पुढील काही वर्षात त्यांची पूर्तता केली जाईल.

सकाळ वृत्तसेवा

मुळा मुठा नदीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा कलमी उपायजोना मांडली असून, पुढील काही वर्षात त्यांची पूर्तता केली जाईल.

पुणे - मुळा मुठा नदीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा कलमी उपायजोना मांडली असून, पुढील काही वर्षात त्यांची पूर्तता केली जाईल. त्यामुळे स्वच्छ व सुंदर नदी बारामाही वाहती असेल असे आयुक्त कुमार यांनी सादरीकरणात स्पष्ट केले.

‘धारा २०२३’ या परिषदेत समारोपाच्या दिवशी आयुक्त विक्रम कुमार यांनी सादरीकरण केले. त्यावेळी ते म्हणाले, नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नद्यांची स्वच्छता, पूराचा धोका कमी करणे, नागरिकांना नदीकिनाऱ्यावर जाणे शक्य होईल अशी व्यवस्था निर्माण करणे, पाण्याचा पुनर्वापर, शहर आणि नदीतीराचा संबंध सुधारणे आणि अस्तित्वात असलेल्या वारसा वास्तू, मनोरंजन, धार्मिक, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम आणि परिसंस्था सुधारणे यासाठी एकत्रित सुविधा निर्माण करणे या सहा कलमी उपाययोजनांवर महापालिका काम करत आहे.

पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या अनुदानाच्या मदतीने नदी शुद्धीकरण प्रकल्प राबवत आहोत. त्याच सोबत ४४ किलोमीटरचा नदी काठ सुशोभित केला जाणार आहे. त्यातील ९ किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. अशा प्रकारे एकाच वेळी दोन पातळ्यावर महापालिकेचे काम सुरू आहे. पुढील तीन वर्षात हे का पूर्ण होईल. पुणे हे देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य योग्य शहर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवसात पुण्यासह अयोध्या, औरंगाबाद, ग्वाल्हेर आणि मोरादाबाद या शहरातील नदी सुधार प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले.

पाच वर्षात २५ अब्ज डॉलर्सचा पुरवठा

नदी सुधार प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात एशियन डेव्हलपमेन्ट बँक, वर्ल्ड बँक आणि केएफडब्ल्यू डेव्हलपमेन्ट बँकेच्या प्रतिनिधींना सहभाग घेतला. नदीकिनारी असणार शहरे, क्षेत्रनिहाय निधीसाठी एकात्मिक उपाययोजना, संस्थात्मक पुनर्रचना आणि आर्थिक दृष्टीकोनातून प्रकल्प विकसित करणे या बाबींशी संबंधीत महत्वाच्या मुद्यांवर मांडणी केली.

यावेळी एडीबीचे उपसंचालक हो यून जिआँग म्हणाले, “पुढील पाच वर्षात भारतामध्ये २० ते २५ अब्ज डॉलर्सचा वित्त पुरवठ्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यातील ४० टक्के निधी हा वातावरणीय बदलावरील उपायांसाठी आणि आपत्ती प्रतिबंधक सक्षमता निर्माण करण्यासाठी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT