Railway
Railway 
पुणे

काही रेल्वेगाड्यांना पुणे-मुंबईदरम्यान प्रवासात सवलत

सकाळवृत्तसेवा

पुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई येथून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या विशिष्ट डब्यांसाठी प्रवाशांसाठी सवलत दिली आहे. त्यानुसार या गाड्यांच्या काही डब्यांच्या दरामध्ये पुणे-मुंबई आणि अन्य काही भागांदरम्यान प्रवास भाड्याचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलीत (एसी-३) कोचला एसी चेअर कारचे भाडे आणि शयनयानाला (स्लिपर कोच), आरक्षित सिटींग कोचचे भाडे आकारले जाणार आहे.

मध्य रेल्वेने ठराविक रेल्वे गाड्यांच्या काही डब्यांच्या दरामध्ये सवलत जाहीर केली आहे. ही सवलत येत्या सोमवारपासून (ता.११) लागू करण्यात आली आहे. बदललेल्या दरातील तिकीट रेल्वे स्थानकावर आणि ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत. 

रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सुविधा कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही सवलत जाहीर केली आहे. ही सवलत ठराविक गाड्यांसाठी ठराविक प्रवासादरम्यान असेल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी

या गाड्यांसाठी असेल ही सुविधा
     त्रिवेंद्रम-मुंबई एक्‍स्प्रेसच्या एक एसी-३ कोचला, एसी-२ चेअर कारच्या स्वरूपात पुणे ते मुंबईदरम्यान १७ फेब्रुवारीपासून 

     मद्रास-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेसच्या, दोन स्लिपर कोचला (एस १२ व १३) पुणे ते एलटीटीदरम्यान २६ फेब्रुवारीपासून, तर एलटीटी-मद्रास एक्‍स्प्रेसचे दोन स्लिपर कोच (एस १ व २) ११ फेब्रुवारीपासून आरक्षित सेकंड क्‍लास सिटिंगच्या स्वरूपात चालविण्यात येणार

     नांदेड-पनवेल एक्‍स्प्रेसचे स्लिपर कोच (एस ७ ते एस १०) पुणे ते पनवेलपर्यंत आरक्षित सेकंड क्‍लास सिटिंग स्वरूपात चालविण्यास प्रारंभ झाला आहे. तर, पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेसचे दोन शयनयान कोच (एस ९ व १०) पनवेल ते पुणेदरम्यान ११ फेब्रुवारीपासून आरक्षित सेकंड क्‍लास सिटिंग स्वरूपात चालविण्यात येणार आहे

     हैदराबाद-मुंबई एक्‍सप्रेसचा एक (एस १०) कोच पुणे ते मुंबईदरम्यान सेकंड क्‍लास सिटिंग कोचच्या स्वरूपात चालविला जाणार आहे. तर, मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेसचे (एस ९ व एस १०) कोच मुंबई ते पुण्यापर्यंत ११ फेब्रुवारीपासून सेकंड क्‍लास सिटिंग कोचच्या स्वरूपात चालविले जाणार आहेत

     मुंबई-भुवनेश्वर एक्‍स्प्रेसचे (एस १ व एस २) हे दोन कोच आरक्षित सेकंड क्‍लास सिटिंगच्या स्वरूपात आणि एसी ३ च्या ( बी ५ ) कोचला चेअर कारच्या स्वरूपात मुंबई ते पुणेदरम्यान ११ फेब्रुवारीपासून चालविले जातील.

     मुंबई-मद्रास एक्‍स्प्रेसचे कोच मुंबई ते पुणेदरम्यान सेकंड क्‍लास सिटिंग कोचच्या स्वरूपात ११ फेब्रुवारीपासून चालविणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT