Water Meter
Water Meter sakal
पुणे

Pune News : लोका सांगे ब्रह्मज्ञान...! आयुक्त, महापौर वापरतात मनसोक्त पाणी; बंगल्यासाठी पाणी मीटरच नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे - समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत महापालिकेने सोसायट्या, बंगल्यांमध्ये आत्तापर्यंत १ लाख ३९ हजार पाण्याचे मीटर बसविले आहेत. मात्र, महापौर बंगला, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, जिल्हाधिकारी यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी मिटर बसविलेले नाहीत. याठिकाणी प्रशासनाने त्वरित मिटर बसवावेत अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

महापालिकेने शहराच्या सर्व भागातील नागरिकांना समान पाणी मिळावे यासाठी २४०० कोटी रुपये खर्च करून समान पाणी पुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षापासून या योजनेचे काम सुरु आहे. या योजनेतून कोणत्या भागात पाण्याचा वापर किती होतो, कुठे गळती होत आहे पाणी मिटर बसविल्यामुळे कळणार आहे.

त्यातून पाणी बचत व गळती रोखण्यात यश येणार असल्याचा दावा प्रशासन करत आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३ लाख १८ हजार पाण्याचे मीटर बसविले जाणार असून, आत्तापर्यंत केवळ १ लाख ३९ हजार मिटर बसविण्यात आले आहेत. अद्याप १ लाख ७९ हजार मीटर बसविण्याचे काम अपूर्ण आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, पाण्याचे मिटर बसवून दरडोई १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापर करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईसाठी नोटीस बजावली होती. गेल्यावर्षी महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यामध्ये पाण्याचा वापर किती होतो याची माहिती मागविली होती. त्यावेळी पाणी मिटर बसविले नसल्याचे सांगितले.

एकीकडे नागरिकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला जात असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये मिटर बसविण्यास टाळाटाळ होत आहे. शासकीय निवासस्थानांमधील पाणी वापर समोर येऊ नये म्हणून मिटर बसविले नसल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.

यासंदर्भात अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT