Water Supply
Water Supply sakal
पुणे

Helpline for Water : पाण्यासंबंधीच्या तक्रारींसाठी आता 24 तास हेल्पलाईन

सकाळ वृत्तसेवा

तुमच्या परिसरात नियमीत पाणी येत नाही? कमी दाबाने पाणी येतेय का? जलवाहिनी फुटली आहे का? अशा प्रकारे पाण्यासंबंधी कुठलाही प्रश्‍न असेल, तर तुम्हाला तो प्रश्‍न थेट महापालिका प्रशासनाला तत्काळ कळविता येणार आहे.

पुणे - तुमच्या परिसरात नियमीत पाणी येत नाही? कमी दाबाने पाणी येतेय का? जलवाहिनी फुटली आहे का? अशा प्रकारे पाण्यासंबंधी कुठलाही प्रश्‍न असेल, तर तुम्हाला तो प्रश्‍न थेट महापालिका प्रशासनाला तत्काळ कळविता येणार आहे, त्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यामुळे आता पाण्यासंबंधी तुमच्या असणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे शक्‍य होणार आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेगवेगळ्या भागात पाणी मिळण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात. त्यामध्ये पाणी नियमीत न मिळणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, विकास कामांमुळे जलवाहिन्यांची तोडफोड होण्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे पाणी पोहोचण्यात अडथळे येतात. परिणामी नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरीकांवर अनेकदा थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यापर्यंतची वेळ येते. अशा विविध तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी 24 तास हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

पाणी पुरवठ्यासंदर्भात नागरीकांना तक्रार करण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागाने 020-25501383 हि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी संबंधित क्रमांकावर फोन करुन तक्रार दाखल केल्यानंतर, त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांची समस्या सोडविण्यास पाणी पुरवठा विभागाकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.

पाण्याबाबत तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक - 020-25501383

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT