Electric vehicles sakal
पुणे

Pune News : ॲम्बेसिडरची जागा घेणार ई-मोटार; महापालिकेचा निर्णय

शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांना पांढऱ्या शुभ्र ॲम्बेसिडर मोटारीची भुरळ असायची. त्यामुळे या मोटारीचा पुणे महापालिकेच्या ताफ्यातही समावेश होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांना पांढऱ्या शुभ्र ॲम्बेसिडर मोटारीची भुरळ असायची. त्यामुळे या मोटारीचा पुणे महापालिकेच्या ताफ्यातही समावेश होता. मात्र सुटे भाग न मिळणे, ॲव्हरेज कमी असणे, खर्च वाढणे या कारणांमुळे ही मोटार पांढरा हत्ती बनत चालली आहे.

त्यामुळे महापालिकेने ॲम्बेसिडर मोटारीचा वापर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागी पर्यावरणपूरक आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या ई-मोटारींचा समावेश केला जाणार आहे.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी मोटार, कचरा वाहतूक, पाणीपुरवठा, अतिक्रमण कारवाई, रस्ते खोदाई व दुरुस्ती यांसह इतर कारणांसाठी पुणे महापालिकेच्या ताफ्यात एक हजार ३७८ वाहने आहेत. आवश्यकतेनुसार नवीन वाहने घेणे, १५ वर्षे जुनी झालेली वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू असते.

महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना प्रशासनातर्फे मोटारी पुरविल्या जातात. त्यांच्या मागणीनुसार महापालिकेने ॲम्बेसिडर मोटारीसह इतर प्रकारच्या मोटारी विकत घेतल्या आहेत. सध्या महापालिकेकडे ३९ ॲम्बेसिडर मोटारी असून, त्यांचे आयुर्मान १२ ते १३ वर्षे इतके आहे. आणखी दोन ते तीन वर्षे त्यांचा वापर होऊ शकतो.

मात्र, ॲम्बेसिडर कंपनी बंद झाल्यानंतर या गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगल्या पद्धतीने देखभाल-दुरुस्ती करता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच ‘बीएस ६’ तंत्रज्ञानाच्या मोटारी अद्ययावत असल्याने त्यांची मागणी अधिकाऱ्यांकडून होत आहे.

११० ई-मोटारी घेणार

ध्वनी आणि हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शासकीय संस्थांकडून वाहन खरेदी करत ई-मोटारी घ्याव्यात, असा आदेश दिला आहे. त्यामुळे महापालिकेने ई-मोटारी घेण्यास सुरवात केली आहे. सध्या ६५ ई-मोटारी महापालिकेच्या ताफ्यात आहेत.

आता पाच वर्षांसाठी ११० ई-मोटारी भाड्याने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये चालक, चार्जिंग आणि मोटारींच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च ठेकेदारालाच करावा लागणार आहे.

मोटर वाहन विभागातर्फे ११० ई-मोटारी पाच वर्षांसाठी भाड्याने घेतल्या जाणार आहेत. सध्या महापालिकेकडे ३९ ॲम्बेसिडर मोटारी आहेत, त्यांच्याजागी ई-मोटारींचा वापर केला जाईल. या निविदेत ११० मोटारींचा उल्लेख असला तरी एकावेळी सर्व मोटारी वापरात आणल्या जाणार नाहीत, आवश्यकतेनुसार मागणी केली जाईल व त्यानुसार बिल दिले जाणार आहे.

- हृषीकेश चव्हाण, वाहतूक व्यवस्थापक, मोटर वाहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT