ganpati ganpati
पुणे

Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याचे महापालिकेचे आवाहन

गणेशोत्सव दोन महिन्यांवर आलेला असताना गणेश मूर्ती घडविण्याच्या कामालाही गती आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव दोन महिन्यांवर आलेला असताना गणेश मूर्ती घडविण्याच्या कामालाही गती आलेली आहे. पुणे महापालिकेने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा केला जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून (पीओपी) बनविलेल्या मूर्तीवर बंदी असल्याने या मूर्ती खरेदी करू नये.

शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बसविलेल्या मूर्ती खरेदीस प्राधान्य द्यावे असे आवाहन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.

पीओपीच्या मूर्ती व विषारी रंग वापरल्याने पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती कारागीर आणि उत्पादकांसाठी मे २०२० मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

त्यांचे काटेकोर पालन करणाऱ्या गणेश मूर्तिकार किंवा व्यावसायिकांकडून मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे

- नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल असलेले शाडू माती, चिकण मातीने बनविलेल्या गणेश मूर्ती तयार कराव्यात. कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच पीओपी, पॉलीस्टीरिन यांचा वापर करू नये.

- मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा. मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर करता येईल.

- मूर्ती रंगविण्यासाठी पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. विषारी आणि अविघटनशील रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, इनॅमलचा वापर करता येणार नाही.

- नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुता येतील असे सजावटीचे कपडे वापरावे.

- रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग, खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT