pune Municipal Corporation Asphalt wrong way in Dhayari Mahesh Pokale pune  sakal
पुणे

पुणे : धायरीत चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण; महेश पोकळे

शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे म्हणाले,‘‘धायरी फाटा येथे नियमांचे पालन न करता, वाहतूक सुरू ठेवून डांबरीकरणकरण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक वर्ष सरत आलेले असताना पटापट कामे संपविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. धायरी येथे वाहतूक सुरू ठेवून, रस्त्यावरील माती, दगड न काढता थेट डांबरीकरण केले जात असल्याचा प्रकार शनिवारी (ता. २६) सायंकाळी समोर आला. त्यामुळे अशा कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

धायरी फाटा येथे सणस शाळेच्या बाहेरच्या बाजूने पॅचवर्क करण्यसाठी पथ विभागाकडून अचानक डांबरीकरण सुरू करण्यात आले. या ठिकाणी डांबर टाकण्यापूर्वी हा भाग स्वच्छ करून घेणे, तेथील दगड, माती, काढून टाकणे अशी कामे करणे आवश्‍यक असते. तसेच डांबरीकरण करताना वाहतूक बंद करून रोड रोलरने व्यवस्थित दबाई करून घेणे, डांबर वाळे पर्यंत वाहतूक बंद ठेवणे यासह इतर कामे करणे आवश्‍यक आहे. पण याकडे दुर्लक्ष करून थेट डांबरीकरण सुरू केले.

पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे म्हणाले,‘‘धायरी फाटा येथे छोटाचाच पॅचचे डांबरीकरण केले आहे. हे काम मुख्य खात्याकडून डांबरीकरणाचे काम सुरू आहे.’’ शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे म्हणाले,‘‘धायरी फाटा येथे नियमांचे पालन न करता, वाहतूक सुरू ठेवून डांबरीकरणकरण्यात आले. निकृष्ट पद्धतीने काम करून बिल काढायचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT