involve villages issue
involve villages issue sakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेच्या कारवायांविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, पालिकेने गाव विकत घेण्याची केली मागणी..

विठ्ठल तांबे

धायरी - पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सोयी सुविधांचा प्रचंड अभाव असून त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून महापालिका सक्तीने आणि तिपटीने टॅक्स वसुली करत आहे. लोकांची बांधकामे पाडत आहे. त्यामुळे लोकांमध्ये बैठकीत याबाबत प्रचंड संताप व नाराजी दिसून आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसेवा समूहच्या वतीने करण्यात आला होता.

गावांमध्ये झोनचे कोणतेही सर्वेक्षण न झाल्याने व झोन न बदलले गेल्याने या ठिकाणी बांधकामाच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. बांधकामे अनधिकृत ठरवून मोठमोठ्या इमारती महापालिका पाडत असल्याने ग्रामस्थांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

या सगळ्याच समस्यांच्या बाबत धायरी ग्रामस्थांची‌धायरी गावातील काळभैरवनाथ मंदिरात बैठक झाली. शेकडो ग्रामस्थ या मिटींगला उपस्थित होते.‌ त्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा सभेत मांडला आणि संताप व्यक्त केला. कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना, पाण्याच्या असंख्य तक्रारी असताना त्यावर अर्ज असून देखील महापालिका कोणतीच कारवाई करत नाही. कोणत्यातरी त्रयस्थाच्या सांगण्यावरून बांधकामे पाडून टाकते, ही भावना व्यक्त झाली.

डीपी मंजूर होईपर्यंत गावातील कोणत्याही बिल्डिंगवर कारवाया करू नये व सक्तीची वसुली तातडीने थांबवावी. ५०० स्क्वेअर फुटाच्या सदनिकांना करातून सूट मिळावी. महापालिकेत समाविष्ट गावांचा डीपी त्वरित फायनल करावा. अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी त्वरित सुरू करावी. झोन सर्वेक्षण करून झोन बदली करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

गुंठेवारी सोपी, स्वस्त करावी, डीपी फायनल होईपर्यंत सक्तीची टॅक्स वसुली व बांधकाम पाडण्याची कारवाई त्वरित बंद करावी, अभय योजना सुरू करून शास्ती कर पूर्णतः माफ करावा, सर्व मूलभूत सुविधा द्याव्यात मगच कारवाई आणि टॅक्स वसुली करावा अशाही मागण्या करण्यात आल्या.

'महापालिकेचा टॅक्स ग्रामस्थ भरू शकत नाही त्यामुळे आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. आम्हाला टॅक्सच्या कारवाईतून मुक्त करावे. महापालिकेचा असाच त्रास होत राहिल्यास येणाऱ्या काळातील निवडणुकांवर ३४ गावांच्या वतीने बहिष्कार घालण्यात येईल.'

- राहुल पोकळे (राष्ट्रसेवा समूह, अध्यक्ष)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT