Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे : प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणे अपेक्षीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी केलेली प्रारूप प्रभाग रचना महापालिकेने आज (ता.६) निवडणूक आयोगाकडे सादर केली. ही रचना कायदेशीरपणे झाली आहे की नाही ते तपासून त्यास मान्यता दिली जाईल. त्यानंतर हा प्रारूप आराखडा नागरिकांच्या हरकती व सुचनांसाठी निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल.

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणे अपेक्षीत आहे. पण कोरोनाची स्थिती व प्रभाग रचना करण्यास झालेला विलंब यामुळे काही आठवडे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने एक सदस्याचा प्रभाग ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला.२०२१ ची जनगणना झालेली नसल्याने कायद्यातील तरतुदींचा आधार घेत पुण्यातील नगरसेवकांची संख्या १६१ वरून १७३ पर्यंत वाढविण्यात आली. त्याचा आदेश निघाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीनची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले.

१७३ नगरसेवकांसाठी पुण्यात ५७ प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग दोन सदस्यांचा असे एकूण ५८ प्रभाग असणार आहेत. पुणे महापालिकेला ३० नोव्हेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. पण त्यास उशीर लागत असल्याने प्रशासनातर्फे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ५ डिसेंबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करून ६ डिसेंबर रोजी त्याचा प्रारूप आराखडा सादर करा असे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यानंतर प्रशासनाने दिवसदिवसभर बसून प्रारूप रचना तयार केली. तसेच ही मुदत संपत आलेली असताना काही राजकीय पक्षांनी त्यांच्या सोईनुसार प्रभाग रचना करावी यासाठी अधिकाऱ्यांना भेट घेतल्याचेही प्रकार घडले. दरम्यान, राजकीय घडामोडींनंतर महापालिका प्रशासनाने आज मुंबईत प्रारूप आराखडा सादर केला.

माझ्याही कानावर आले आहे....

रविवारी प्रारूप आराखडा तयार करण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपचे दोन पदाधिकारी आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या सोईनुसार प्रभाग रचना करावी यासाठी हट्ट धरल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘भाजपचे पदाधिकारी आयुक्तच्या बंगल्यावर गेले होते हे माझ्याही कानावर आले आहे, पण ते कोण आहेत हे माहिती नाही. आयुक्तांकडे कोणी गेले म्हणजे ते महापालिकेच्या इतर कामासाठी देखील जाऊ शकतात. प्रभाग रचनेसाठीच गेले असे नाही. आज मी देखील आयुक्तांना भेटण्यासाठी जाणार आहे, पण पीएमपीच्या विषयात भेटणार अशी पुष्टीही पाटील यांनी सोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT