Pune Municipal Corporation has cleaned the sewer at Parvati.jpg 
पुणे

Sakal Impact : सांडपाणी वाहिनीची गळती थांबली

सागर कुलकर्णी

पर्वती (पुणे) : सह्याद्री मैदानाच्या कडेच्या इमारतीखाली सांडपाणी वाहिनी गळतीमुळे सह्याद्री मैदानाची दूरावस्था झालेली होती. मैदानावर चिखल साचत होता. मैदानावर सकाळी मुले खेळायला आणि नागरिक व्यायामासाठी येत असतात. त्यांना अडथळा येत होता. या सांडपाणी वाहिनी मागील दोन महिन्यांपासून फुटली होती. यामुळे शेजारील इमारतीसाठी मैदानाच्या कोपऱ्यात डबके साचले होते. 

परिसरात डास आणि दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास नागरिकांना सहन करावा‌ लागत होता. महापालिका अधिकारी पाहून जायचे, परंतु तात्पुरत्या स्वरुपात काम केले जायचे. पुन्हा गळती व्हायची. सांडपाणी वाहिनीचे काम लवकरात लवकर करावे. यांसंबधीचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून सांडपाणी वाहिनी साफ करण्यात आली आहे. याठिकाणी आता पाणी साचत नाही आणि मैदानावर पाणी येत नाही.

आम्ही याठिकाणी सांडपाणी वाहिनी साफ केली आहे. दोन दिवसांनंतर चेंबर बसविण्यात येईल.
- शंकर खंडागळे, अभियंता, पुणे महापालिका

सांडपाणी वाहिनी गळतीमुळे सह्याद्री मैदानाची दूरावस्था झालेली होती. महापालिकेकडून लगेचच काम करण्यात आले. सांडपाणी वाहिनी साफ केल्यामुळे महापालिका आणि सकाळचे धन्यवाद. 
- गणेश वाघचौडे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT