Hotel_Pune 
पुणे

पुणेकर खवय्यांसाठी 'थोडी खुशी थोडा गम'; वाचा महत्त्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवनवीन आणि चमचमीत पदार्थ खाण्यात माहीर असलेल्या पुणेकरांना हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र यात जरा धीर देणारी बाब म्हणजे लॉकडाउन काळातही पार्सल सेवा सुरूच असेल. 

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनबाबत असलेले अनेक नियम शिथिल करण्यात आले आहे. केंद्र सरकारने काही ठिकाणी हॉटेल देखील सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्राचे सर्वच नियम राज्यात किंवा शहरात लागू नाहीत. याबाबत पुणे महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकात खाद्यपदार्थांची सेवा 30 जूनपर्यंत पार्सल पद्धतीने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी देखील तूर्तास हॉटेल सुरू होणार नसल्याचे रविवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारपासून (8 जून) हॉटेल सुरू होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

"एवढ्यात हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली तरी ते लगेच सुरू होतील असे वाटत नाही. कारण हॉटेलमध्ये काम करणारे जवळपास 70 टक्के कर्मचारी त्यांच्या गावी गेले आहेत. हॉटेल सुरू झाल्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती सर्व खबरदारी घेतली जाणार आहे," असे पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : 
दोन टेबलमध्ये सामाजिक अंतर ठेवणे. 50 टक्के कर्मचारी कामावर असणे. ज्या ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक यांच्या स्पर्श लागणार आहे त्या सर्व जागा सतत सॅनिटाइझ करणे. तसेच काम करत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. आत्ता देखील सर्व नियम पाळण्यात येत आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.

लगेच हॉटेल सुरू करणे अवघड : 
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी टेबल मांडण्यापासून इतर अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागणार आहेत. व्यवसाय सुरू करण्यासह ग्राहकांची सुरक्षादेखील तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सुरक्षाविषयक वस्तू हॉटेलमध्ये बसवाव्या लागणार आहे. त्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे अगदी उद्या जरी परवानगी मिळावी तरी लगेच हॉटेल सुरू करणे अवघड आहे, असे असोसिएशनचे सरकार्यवाहक किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

30 जूननंतर शहरातील हॉटेल सुरू होतील असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरात आठ हजार 500 हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आहेत. त्यातील केवळ दहा टक्के व्यावसायिक पार्सलची सेवा पुरवत आहेत. तर बार बंदच आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. परवानगी मिळाल्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सेवा पुरविण्यावर भर असेल.
-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Children Hostage: रोहित आर्यने खिडक्यांना सेन्सर का लावले होते? पोलिसांनी त्याला कसा चकमा दिला?

Vehicle NOC Rule: महत्त्वाची बातमी! एनओसी नियमात बदल; जुन्या वाहनांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाहन मालकांना दिलासा

Rohit Arya : निधी मिळण्यासाठी रोहित आर्यने पुण्यात केले होते उपोषण

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Georai News : गेवराईतील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा नळ योजना अपुर्णच

SCROLL FOR NEXT