Pune Road News  sakal
पुणे

Pune Road News : कर भरूनही जीवघेणे रस्ते ; महापालिकेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष,फटींमुळे चालकांची कसरत

दांडेकर पूल चौकातून धायरीच्या दिशेने जाताना महिलेच्या दुचाकीचे चाक रस्त्यावरील फटीत गेले. दुचाकी घसरून दुभाजकाला धडकली. त्याचवेळी तेथून जाणारा ट्रक महिलेच्या अंगावरून गेला आणि महिलेचा देह निपचित पडला, ही घटना नुकतीच घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दांडेकर पूल चौकातून धायरीच्या दिशेने जाताना महिलेच्या दुचाकीचे चाक रस्त्यावरील फटीत गेले. दुचाकी घसरून दुभाजकाला धडकली. त्याचवेळी तेथून जाणारा ट्रक महिलेच्या अंगावरून गेला आणि महिलेचा देह निपचित पडला, ही घटना नुकतीच घडली. ‘‘आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, तरीही किती जीव जाण्याची वाट महापालिका प्रशासन बघणार आहे,’’ असा प्रश्‍न आता नागरिक विचारू लागले आहेत.

शहरातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), स्वारगेटहून हडपसरकडे जाणारा सोलापूर रस्ता, खडकी रेल्वे स्थानकाजवळील जुना पुणे-मुंबई महामार्ग, गणेशखिंड रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, विश्रांतवाडी, आळंदी रस्ता अशा काही प्रमुख रस्त्यांसह अन्य रस्त्यांमध्ये धोकादायक फटी पडल्या आहेत.

शहराच्या कोणत्याही भागातील रस्ते सलग नाहीत. बहुतांश ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांना जोडणाऱ्या जागेतील डांबर किंवा सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे तेथे भेगा आणि खड्डे तयार झाले आहेत. त्यात दुचाकीचे चाक गेल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. काही घटनांमध्ये दुचाकीस्वारांना प्राण गमवावा लागला आहे. असे असताना केवळ भरधाव दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू, अशी पोलिस दफ्तरी नोंद केली जाते. परंतु, संबंधित अपघात हा रस्त्यांमधील फटी, खड्डे न बुजविल्यामुळे झाली असल्याची कुठेही नोंद होत नाही, हे वास्तव आहे.

काय आहे परिस्थिती

  • सिंहगड रस्त्यावर काँक्रीटचा रस्ता संपतो, त्या ठिकाणचे सिमेंट/डांबर जाऊन खड्डे

  • वडगाव पुलापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत, हिंगणे, रेसकोर्स व लष्कर परिसरातील रस्त्यांवर जीवघेण्या फटी

  • रस्ते एकसलग नाही, उंची समांतर नाही, मोठमोठे खड्डे

  • दुभाजक तुटक्‍या अवस्थेत

दांडेकर पुलाजवळील रस्त्यावर फटीत दुचाकी गेल्याने माझ्या मैत्रिणीचा जीव गेला. मी स्वतः तीन वेळा या फटींमुळे पडून जखमी झालो. अशी वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रारी नोंदविल्या. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

- धनंजय देशमुख, वैज्ञानिक

सिंहगड रस्त्यावर सिमेंट निघून तेथे फटी पडल्या आहेत. हा प्रश्‍न गंभीर असून, सिमेंट किंवा डांबर टाकून फटी तत्काळ भरून घेण्याच्या सूचना पथ विभागाला दिल्या आहेत. यांसह इतर रस्त्यांवरील कामेही लवकरच पूर्ण केली जातील.

- अनिरुद्ध पावसकर,

प्रमुख, पथ विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT