Pune Municipal Corporation sakal
पुणे

सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी पुणे महापालिका जागा देणार

पुणे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ‘अर्बन फूड सिस्टिम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ‘अर्बन फूड सिस्टिम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सेंद्रिय शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेंद्रिय शेतमालाच्या विक्रीसाठी पुणे महानगरपालिका शेतकऱ्यांना शहरात जागा व ओटे उपलब्ध करून देणार आहे. ही जागा सेंद्रिय शेतमाल उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांना दिली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ‘अर्बन फूड सिस्टिम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सेंद्रिय आणि विषमुक्त शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा कृषी विभागाचा उद्देश आहे. शहरी बाजारपेठेत सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतमालाची मागणी जास्त आहे. या मागणीनुसार सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतमाल पुरवठा केला जाणार आहे.

यासाठी ‘अर्बन फूड सिस्टीम’अंतर्गत आत्मा, कृषी, पणन विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात शेतकरी आठवडे बाजार, सुनियोजित किरकोळ बाजार, मिड डे मिल या संकल्पनेतील शाळांचे किचन व ओटा मार्केट आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी महापालिका ही जागा व ओटे उपलब्ध करून देणार आहे.

अर्ज कोठे करावा?

यासाठी आवश्‍यक पात्रता, निकष, अर्जाचा नमुना आदी माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी त्यांचे अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह येत्या २० जुलैपर्यंत सादर करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT