kit
kit 
पुणे

पुणेकरांनो, महापालिका करणार एक लाख किटची खरेदी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात कोरोनाचे रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर उपचारासाठी उपयुक्त ठरलेल्या ‘ॲन्टीजेन’ चाचणीच्या किटचा भाव उतरला आहे. म्हणजे, हे किट स्वस्त झाले असून, नव्या एक लाख किट खरेदीनंतर पुणे महापालिकेचे तब्बल ४६ लाख रुपये वाचणार आहेत. त्यानुसार ४ कोटी ५८ लाख रुपयांमध्ये नवीन किट खरेदीचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला आहे.

 नवीन रुग्ण शोधून त्यांना विलग करण्यासोबतच गर्भवतींसह हृदयरोग, मूत्रपिंडासारख्या आजारांच्या रुग्णांवर उपचार आणि आवश्‍यक त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ॲन्टीजेन चाचणी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे आणखी एक लाख किटची खरेदी करणार असल्याचे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ पाठोपाठ ‘ॲन्टीजेन’ चाचणी करण्यात येत आहे. विशेषत रुग्णांच्या सपंर्कातील नागरिकांची तपासणी करून त्यांना वेळीच विलग करण्यासाठी ही तपासणी केली जाते. त्याचा अहवाल अर्ध्या तासातच येतो. त्यासाठी यापूर्वी एक लाख किटची खरेदी केली होती. तेव्हा त्यांची प्रत्येकी किंमत ५०४ रुपये इतकी होती. हे किट संपत आल्याने आता नव्याने तेवढेच किट खरेदीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त रुबल  अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन मांडला. मात्र, ही खरेदी करताना किटचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे प्रत्येक किटच्या खरेदीमागे ४६ रुपये वाचणार आहेत. आता ही किट ४५८ रूपयांना मिळणार आहे. परिणामी, एकूण खरेदीमध्ये ४६ लाखांची बचत होणार असल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जम्बो सेंटरसाठी ७५ कोटी
कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना नेमके उपचार देऊन त्यांना बरे करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड केअर सेंटरसाठी पुणे महापालिकेने आपल्या वाट्याचे ७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ५० कोटी रुपये ‘पीएमआरडीए’कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. उर्वरित २५ कोटी रुपये पुढील महिन्यात देणार आहे.  

  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने उभारणार तीन सेंटर
  • रुग्णांना मिळणार आयसीयू, ऑक्‍सिजन बेडची सुविधा 
  • सुमारे अडीच हजार बेड उपलब्ध होणार
  • तीन सेंटरसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च
  • राज्य सरकार, जिल्हा नियोजन समिती आणि पुणे-पिंपरी महापालिका करणार खर्च 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT