pune municipal corporation works katraj-kondhawa road construction sign boards  Sakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेला आली जाग; कात्रज-कोंढवा रस्ता डांबरीकरण, फलक आदी उपाययोजना

दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर लावण्याचे काम पथ विभागाकडून हाती घेण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा : मागील काही दिवसांपासून वाढलेले अपघातांचे सत्र आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार पुणे महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर लावण्याचे काम पथ विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.

गोकुळनगर चौकात बाजूपट्ट्या मारणे, शत्रुंजय मंदिर चौकात डांबरीकरण, नुकतेच दोन अपघात झालेल्या स्मशानभूमीजवळील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी किमान १४०० मेट्रिक टन डांबराची आवश्यकता असताना केवळ ४०० मेट्रिक टनांमध्ये काम करण्यात आले. पावसामुळे डांबर उपलब्ध झाले नाही.

रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यातच काम करावे लागले, असे पथ विभागाकडून सांगण्यात आले. तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी तातडीने भूसंपादन करून संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी आहे. तसेच शत्रुंजय मंदिर चौक ते खडीमशीन चौकापर्यंत पाणीपुरवठा विभागाने खोदाई केल्याने तयार झालेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत, याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

येत्या काळात डांबर उपलब्ध झाल्यास आणि पावसाने उघडीप दिल्यास माउलीनगर परिसर तसेच शत्रुंजय ते एसबीआय बँक चौकापर्यंत डांबरीकरण करण्याची योजना आहे. लवकरच रस्ता खड्डेमुक्त होईल.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथ विभाग महापालिका

केवळ डांबरीकरण हा उपाय महत्त्वाचा नाही. तातडीने भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे.

- संतोष लोंढे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT