Pune Municipal Elections responsibility on Rajesh Pandey politics
Pune Municipal Elections responsibility on Rajesh Pandey politics sakal
पुणे

Pune Municipal Elections : महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राजेश पांडेच्या खांद्यावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणूका कधी होणार ? याची वाट सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पाहात असताना भाजपने आज प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

पुणे महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपून सव्वा वर्ष झालेला असला तरीही अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. प्रभाग रचना व ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवर अंतिम निर्णय आल्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे.

कदाचित महापालिका निवडणुका आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही होऊ शकतात असा अंदाज सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे नेते वर्तवीत आहेत. महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

पांडे यांची गेल्याच महिन्यात त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच प्रमाणे पुणे ग्रामीण आणि मावळ या भागाचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता परत पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे.

यापूर्वीही होती जबाबदारी

पांडे हे पूर्वी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस म्हणून कार्यरत असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पांडे यांच्याकडे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता बावनकुळे यांनी पुन्हा पांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.

‘‘गेल्या पाच वर्षात भाजपने महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीतही मागील यशाची पुनरावृत्ती करू. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे.’’

- राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT