high speed 5G network  
पुणे

पुणे होणार सुपरफास्ट; 5G साठी वेगात प्रक्रिया होणार

पुण्यात ५जी नेटवर्क लवकरच उपलब्ध होणार आहे

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुण्यात आपण सध्या फोरजी नेटवर्क वापरत आहोत. पण पुण्यात ५जी नेटवर्क लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यासाठी पुणे महापालिकेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गतीने परवागनी द्यावी असे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने घेतलेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. देशातील १३ शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ५जी सेवा सुरू होणार असून, यामध्ये पुणे शहराचा समावेश आहे.

केंद्र सरकारने नुकतीच ५जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला, त्यातून तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये देशातील सर्व आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला असल्याने आता ५जी सेवा आॅक्टोबर महिन्यात सुरू होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान या संदर्भात मुंबई येथे एक बैठक झाली त्यामध्ये ५जी सेवेबद्दल आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहराचाच पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने कंपन्यांना टॉवर्स, डक्ट्स आणि ट्रान्समीटर बसविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्यासाठीच्या परवानग्या लवकर द्याव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.

एक समान खोदाई शुल्क असणार

सध्या राज्यात प्रत्येक शहरात सेवा वाहिन्या टाकण्यासाठी भिन्न स्वरूपाचे शुल्क आहे. पुण्यात प्रति मीटर १२ हजार रुपये शुल्क आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत खोदाई शुल्क व अन्य शुल्क एकच असणार आहे. हे शुल्क राज्य शासनच निश्चित करणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

५जी म्हणजे काय आहे?

५जी ही मोबाईल नेटवर्कची ५वी जनरेशन असून नेटवर्क स्पीड, कोणत्याही अडचणीशिवाय एचडी सर्फिंग, सर्वोत्तम सेवा असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांसह इंटरनेट व त्याच्याशी संबंधित सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. ४जीचा इंटरनेट स्पीड १ जीबीपीएस पर्यंत आहे. ५जी आल्यानंतर हा स्पीड २० जीबीपीएस पर्यंत जाणार आहे. तंत्रज्ञान हेल्थकेअर, व्हर्च्युअल रिअॅलिटी, क्लाऊड गेमिंग यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहे. तसेच कृषी, शिक्षण, आरोग्य, परिवहन, दळणवळण यासाठीही फायदा होणार आहे.

पहिल्या टप्प्यात १३ शहरांचा समावेश

दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी ५जी सेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पुण्यासह मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, या शहरांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT