hutatma babu genu parking sakal
पुणे

Vehilce Parking Issue : पुण्यातील पार्किंग वाहनतळांवर जबरदस्तीने वसुली; जाब विचारणाऱ्यांना दमदाटी

पुण्यात महापालिकेच्या वाहनतळावरील कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा व जबरदस्तीने पैसे उकळण्याचा व्यवसाय सर्रासपणे कसा सुरू आहे, याचे भयावह चित्र यातून स्पष्ट होते.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - ‘लक्ष्मी रस्त्यावर दुपारी खरेदीसाठी आल्यानंतर मंडई परिसरातील महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोटार लावली. खरेदीनंतर रात्री आठ वाजता मोटार घेण्यासाठी आलो, तेव्हा तेथील तरुणांनी पाच तासांचे २०० रुपये मागितले, त्यावर इतके पैसे कसे? अशी विचारणा केल्यानंतर तेथील तरुणाने अरेरावीची भाषा करून दमदाटी सुरू केली.

रोख रक्कम नसल्याने त्यांना ऑनलाइन पैसे देतो, असे सांगितल्यावर त्यालाही त्यांनी विरोध केला. नंतर त्याने गाडीची चावी काढून घेत धमकी देण्यास सुरुवात केली. माझी पत्नी गर्भवती आहे, तिच्यासमोर भांडणे नको, म्हणून मी एका दुकानदारास ऑनलाइन पैसे देऊन मिळालेली रोख रक्कम पार्किगवाल्यांना देऊन स्वतःची सुटका केली,’ संगणक अभियंता तरुणाला महापालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू वाहनतळावर आलेला हा अनुभव.

महापालिकेच्या वाहनतळावरील कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा व जबरदस्तीने पैसे उकळण्याचा व्यवसाय सर्रासपणे कसा सुरू आहे, याचे भयावह चित्र यातून स्पष्ट होते.

लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, रविवार पेठ यासह मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक खरेदीसाठी येतात. महात्मा फुले मंडईत आलेले नागरिक आपली दुचाकी, चारचाकी वाहने मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या पार्किंगमध्ये लावतात. तेथे महापालिकेने आकारलेल्या दरानुसार पैसे घेणे अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात तेथील कर्मचारी नागरिकांकडून दुप्पट किंवा मनमानी पद्धतीने पैसे आकारतात. नागरिकांनी जादा पैसे देण्यास नकार दिल्यास पार्किगमधील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दमदाटी, शिवीगाळ करून धमकावण्याच्या घटना घडत आहेत. बहुतांश नागरिक त्यांच्यासमवेत कुटुंब असल्याने वाद टाळत, त्यांच्याशी वैर घेतल्यास कुटुंबाला धोका पोहचेल, या भीतीने तेथून निघून जातात. इतके गंभीर प्रकार घडूनही महापालिका प्रशासनाला मात्र त्याची खबर नसल्याचे दुर्दैव आहे.

वसुलीसाठी गुंडप्रवृत्तीचे तरुण

महापालिकेच्या ठरावीक पार्किंगच्या ठिकाणी नागरिकांना तेथील कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळते. कम्प्युटराइज्ड किंवा प्रिंटेट बिल मिळते, वादाचे प्रसंग कमी घडतात. मात्र काही ठेकेदारांकडून पार्किंगमध्ये पैसे घेण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना ठेवण्यात आले आहे. नागरिकांशी अतिशय अरेरावीची व उर्मट भाषा, उद्धट वर्तन व वेळप्रसंगी दमदाटी, शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास कोणी धजावत नसल्याने त्यांचा मुजोरपणा वाढत आहे. मंडई परिसरातील हुतात्मा बाबू गेनू वाहनतळावर नागरिकांना या स्वरूपाचा वाईट अनुभव येत असल्याची सद्यःस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी नारायण पेठेत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला पार्किंगमधील तरुणांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला होता. त्यानंतर अजूनही काही पार्किंगमधील बेबंदशाही बंद झाली नसल्याची सद्यःस्थिती आहे.

अशी आहे वाहतळांवरील सद्यःस्थिती

  • पार्किंगच्या ठिकाणी कॉम्प्युटरराइज्ड, प्रिंटेड बिल देण्याची व्यवस्था नाही

  • महापालिकेने पार्किंगसाठी निश्‍चित केलेल्या दराचे फलक नाहीत

  • पार्किंगच्या ठिकाणांवरील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नाही

  • पावती पद्धतीद्वारे सर्रासपणे जादा पैसे उकळण्याचा प्रकार सुरू

  • पार्किंगच्या ठिकाणी डिजिटल पेमेंट/ऑनलाइन पैसे घेण्याची सुविधाच नाही

  • महापालिकेकडून पार्किंगवर दैनंदिन देखरेख ठेवण्याची व्यवस्था नाही

  • पार्किंगबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी व्यवस्था नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT