Zika virus sakal
पुणे

Zika Virus : ‘झिका’मुळे पुणे पालिका आणखी सतर्क;रुग्ण आढळलेल्या परिसरातील गर्भवतींची प्रशासन करणार तपासणी

‘झिका’चा रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून त्या भागातील पाच किलोमीटरमधील सर्व गर्भवतींची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘झिका’चा रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून त्या भागातील पाच किलोमीटरमधील सर्व गर्भवतींची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या. ‘झिका’ विषाणूंच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या सूचना देण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘झिका’ विषाणूंच्या संसर्गाचे रुग्ण वेगवेगळ्या भागात आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने या सूचना दिल्या आहेत. ‘झिका’ विषाणूंच्या संसर्गामुळे गर्भवती आणि नवजात अभ्रकाच्या आरोग्याला धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.

शहरात आतापर्यंत एरंडवणे आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ‘झिका’चे रुग्ण आढळत होते. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात ‘झिका’च्या रुग्णांचे निदान होत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात सोमवारपर्यंत (ता. १५) ‘झिका’चे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० गर्भवती आहेत.

गर्भवतींना धोका का आहे?

‘झिका’चा संसर्ग गर्भवतींना झाल्यास प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो. तसेच, गर्भपात किंवा बाळाला जन्मतः दोष होण्याची भीती असते. काही रुग्णांमध्ये मेंदुविकाराची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे गर्भवतींची तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

शहरात आतापर्यंत १६७ गर्भवतींची तपासणी करण्यात आली आहे. एरंडवणे, मुंढवा, कोथरूड, बावधन, पाषाण, आंबेगाव बुद्रुक, खराडी, कळस या भागांत आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातील गर्भवतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून सुमारे दोन हजार ४०८ गर्भवती असल्याची माहिती पुढे आली आहे. या गर्भवतींना ‘झिका’च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी त्यांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

दृष्टीक्षेपात झिका संसर्ग

भाग गर्भवतींची

संख्या तपासणी केलेल्या

गर्भवती

खराडी ६४२ २४

आंबेगाव बुद्रुक ५३१ ०

येरवडा ५५३ १७

कोथरूड-बावधन ३५१ १४

पाषाण १९१ ७२

कोंढवा १७८ ०

वारजे-कर्वेनगर ७२ १७

ढोले पाटील, हडपसर ६० २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT