Pune Murder: sakal
पुणे

Pune Murder: धक्कादायक! झोपण्यासाठी बिछाना घेण्यावरून वाद अन्..., भावाने दाबला बहीणीचा गळा, घटनेनं पुणे हादरलं

Brother killed Sister: झालेल्या झटापटीत शारिफने साफियाचा गळा दाबला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्याने तिला रूग्णालयात दाखल केले

सकाळ वृत्तसेवा

Hadapsar: मध्यरात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी बिछाना घेण्याच्या कारणावरून बहिण-भावामध्ये झालेल्या झटापटीत भावाकडून गळा दाबला गेल्याने बहिणीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना १७ जुन रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून हडपसर पोलिसांनी मुलीच्या भावाला अटक केली आहे.

साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रा. वैदूवाडी, हडपसर) असे मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. तर शारीख सुलेमान अन्सारी (वय १८, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील वैदुवाडी येथे अन्सारी कुटुंब राहतात.

साफिया व सुलेमान हे दोघेही बहिण-भाऊ होते. १७ जुन रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास साफिया तिच्या खोलीमध्ये झोपली होती. त्यावेळी शारिखला झोपायचे असल्याने त्याने बिछाना घेण्यासाठी साफियाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

त्यानंतरही ती प्रतिसाद देत नसल्याने त्याने सातत्याने दरवाजा ठोठावला. त्याचा राग आल्याने साफिया खोलीच्या बाहेर आली. त्यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे झाली. या घटनेनंतर साफिया घराच्या बाहेर निघून जात होती, तेव्हा शारिफने तिला घरात आणले. तेव्हा, साफियाने स्वयंपाकघरातील चाकू आणून शारिफला मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी झालेल्या झटापटीत शारिफने साफियाचा गळा दाबला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्याने तिला रूग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी तिला मृत घोषीत केले.

प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी साफियाचा भाऊ शारिख यास अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोडवे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT