पुणे

शिरूरजवळील भीषण अपघात उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

CD

शिरूर, ता. ११ : पुणे- नगर महामार्गावरील शिरूर बाह्यवळणावर यू- टर्न घेणाऱ्या मोटारीला कंटेनरने मागून दिलेल्या धडकेमुळे झालेल्या साखळी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वाडेगव्हाणचे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) उद्योजक किशोर यादव आणि आयटी अभियंता प्रथमेश लाड यांचा समावेश आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास हॉटेल संग्रामसमोर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक किशोर नामदेव यादव (वय ३८, रा. वाडेगव्हाण) हे आपल्या एन्डेवर मोटारीने (क्र. एमएच १२ एसयु ५५८९) शिरूरहून वाडेगव्हाणकडे जात होते. हॉटेल संग्रामसमोर यू- टर्न घेताना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार दुभाजकाजवळ थांबलेल्या दुचाकीवर (क्र. एमएच १० डीयू ५०५२) आदळून विरुद्ध दिशेच्या लेनवर गेली. त्याचवेळी पुणे- संभाजीनगर या शिवाई बसने (क्र. एमएच ४९ बीझेड ८०६०) मोटारीला समोरून धडक दिली.
या भीषण अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला असून, किशोर यादव आणि दुचाकीस्वार प्रथमेश लाड (वय ३०, रा. शिरूर, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. यादव हे वाडेगव्हाणच्या सरपंच प्रियांका यादव यांचे पती होते. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असून, महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस निरीक्षक विनोद पाटील व पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. शिरूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT