Burning Truck Sakal
पुणे

Burning Truck : पुणे नाशिक महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आग विझवण्यात यश

भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आज रात्री साडे साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली.

रवींद्र पाटे

नारायणगाव - येथील पुणे नाशिक महामार्गावरून पुणे येथून दिल्लीकडे दुचाकी वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटरीची भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आज रात्री साडे साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. हा बर्निंग ट्रकचा थरार पाहून भीतीचे वातावरण पसरले.

स्थानिक ग्रामस्थ, पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्याचा फवारा मारून वेळीच आग विझवली. दरम्यान कंटेनर मधील सुमारे नऊ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या जळून खाक झाल्या. मात्र सुमारे वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर आगीपासून वाचवण्यात यश आले.

हरियाणा येथील उमरदिल हा चालक वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या व कच्चा माल कंटेनर ( RJ06GC 8072 ) मधून घेऊन पुणे येथून दिल्ली नोएडा येथे निघाला होता. दरम्यान आज रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कंटेनर येथील बाह्यवळण रस्त्यावर आला असता कंटेनरच्या मागच्या बाजूकडून धुराचे लोट येऊ लागले.या बाबतची माहिती इतर वाहन चालकांनी ट्रक चालकाला दिली.

भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरला आग लागल्याने हा थरार पाहून महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बाबतची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कोकणे, हासे, कोतकर,पोलीस पाटील तथा आपदा मित्र सूशांत भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते आकाश कानसकर, रोहित भूमकर,संतोष खैरे,अनिकेत वाजगे,ग्राम सुरक्षा दलातील जवान आदित्य डेरे, राजकुमार चव्हाण,साहिल मंडल,ओमकार ढमाले,आशिष शहा, स्वप्निल पाटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्रसंगावधान राखून त्यांनी पेटता कंटेनर नवीन बाह्यवळण वळण रस्त्यावरून जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील डेरे यांच्या सर्विस स्टेशन कडे घेण्याची सूचना कंटेनर चालकाला केली. आग लागलेला कंटेनर सर्विस स्टेशन मध्ये पोहोचताच पाईपच्या साह्याने हाय प्रेशरचा पाण्याचा फवारा कंटेनरच्या आतील भागात मारल्याने बॅटरीना लागलेली आग क्षमवण्यात यश आले.

दरम्यान कंटेनर मधील सुमारे दहा लाख रुपयांच्या वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या व कच्चामाल जळून खाक झाला. मात्र आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे सुमारे वीस लाख रुपये किमतीचा कंटेनर आगी पासून वाचवण्यात यश आले. पोलीस, ग्राम सुरक्षा दलाचे जवान व स्थानी ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे कंटेनर होणार मोठे नुकसान व महामार्गावरील संभाव्य दुर्घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT