पुणे

नारायणगावात तरसाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

CD

नारायणगाव, ता. ७ : येथील पुणे- नाशिक महामार्गावरील मुक्ताबाई ढाब्या समोर अज्ञात वाहनाची धडक बसून तरस या वन्य प्राण्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ६) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झाली. मृत तरस मादी सुमारे तीन वर्षे वयाची होती.
पुणे- नाशिक महामार्गावरील मुक्ताबाई ढाब्यासमोर गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता तरस महामार्ग ओलांडून पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे जात होता.
दरम्यान पुण्याच्या दिशेने जात असलेल्या मोटारीने धडक दिल्याने तरस जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे, अभय वारुळे यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ हे घटनास्थळी दाखल झाले. तोंडाकडील बाजूला वाहनाची धडक बसल्याने तरसाचा मृत्यू झाला.
दरम्यान, नारायणगाव ते चौदा नंबर दरम्यानच्या पाच किलोमीटर भाग अपघात प्रवण क्षेत्र आहे. या भागात मागील दोन वर्षात दोन कोल्हे, तीन तरस, सहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. या भागात मीनापूरक, डिंभे डावा कालवा, मीना नदी आहे. तसेच या भागात बागायती ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी भक्ष व पाण्याच्या शोधात फिरत असतात. येथील महामार्ग वन्य प्राण्यांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरला आहे. वनविभागाच्या वतीने या भागात महामार्गावर वाहने सावकाश चालविण्याचे फलक लावले आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी वाहने सुसाट असतात. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मृत्यू होत आहे. या भागात डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT