मंचर, ता. ७ : खेड, आंबेगाव व जुन्नर परिसराचा विकास साधायचा असेल, तर पुणे- नाशिक रेल्वे मूळ मार्गानेच झाली पाहिजे, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. तसेच, रविवारी (ता. ९) होणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘खासदार म्हणून कार्यरत असताना पुणे- नाशिक रेल्वेची संकल्पना मांडली. सुमारे १२ वर्षांच्या प्रयत्नांनंतर २०१६मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी २ हजार ४२५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली. त्यावेळी रेल्वे चाकण- खेड- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- संगमनेर- सिन्नर या मूळ मार्गाने धावणार होती. त्यानंतर प्रकल्प दुहेरी व देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प करण्याचे निश्चित झाले. २०१९ पर्यंत प्रकल्पाची किंमत सुमारे १६ हजार ३९ कोटी रुपये झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत मूळ मार्गाला बायपास केल्याने या भागाच्या विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षांत जीएमआरटीचा अडथळा निर्माण झालेला नाही. जीएमआरटीमुळे रेल्वेला अडथळा येऊ शकत नाही, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू शकतो. याबाबतची माहिती माझ्याकडे आहे. मूळ मार्गासाठी अंतिम यश मिळेपर्यंत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
दरम्यान, पूर्वनियोजित कामानिमित्त ७ ते १४ ऑगस्टदरम्यान बाहेरगावी असल्याने आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जीएमआरटीच्या संशोधन कार्यास बाधा न आणता पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ किंवा थेट मार्गाने नेता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केल्याचे स्वागत आहे. मात्र, ही समिती यापूर्वीच स्थापन होणे अपेक्षित होते.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.