पुणे

मंचरमध्ये कंटेनरवरून रेल्वेची सवारी

CD

मंचर, ता. १५ : पुणे- नाशिक रेल्वेमार्गाची प्रतीक्षा करणाऱ्या आंबेगाव, खेड व जुन्नरमधील नागरिकांना शुक्रवारी (ता. १५) मंचर बाह्यवळण मार्गावर कंटेनरवरून रेल्वेचे डबे नेताना दिसले. या दृश्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या तीन दशकांपासून या भागातील नागरिक रेल्वेचे आश्वासन ऐकत आहेत. लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा केंद्रस्थानी होता. शुक्रवारी कंटेनरवरून जाणारे रेल्वे डबे पाहून अनेकांनी त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले. ‘आमच्या भागात अखेर रेल्वे आली,’ अशा मिश्किल पण उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
राजगुरुनगर, शेवाळवाडी, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरात रेल्वेसाठी भूसंपादन झाले आहे, मात्र प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही. हा मार्ग अहिल्यानगरकडे वळवल्याच्या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘आमच्या हयातीत तरी रेल्वे धावणार का?’ असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. कंटेनरवरील त्या डब्यांनी पुन्हा एकदा प्रशासकीय दिरंगाईवर प्रकाश टाकला आहे.

15793

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT