पुणे

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

चंद्रकांत देवकते

मोहोळ: क्रिकेट व व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविलेला राष्ट्रीय खेळाडू नितीन सुभाष गायकवाड याने अज्ञात कारणावरून सिना नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २८ सप्टेबर रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठ (रा. मोहोळ) येथील नितीन सुभाष गायकवाड ( वय ४८ ) हा दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घरातून बाहेर गेला. तो रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने ता. २७ तारखेला मोहोळ पोलीस ठाण्यात नितीन गायकवाड बेपत्ता असल्याबाबत त्याचा भाऊ प्रविण गायकवाड यांनी खबर दिली होती .

दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास नितीन गायकवाड याचा मृतदेह लांबोटी परिसरामध्ये सिना नदीच्या पात्रात आढळून आला. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असून पोलीस ठाण्यात अज्ञात कारणामुळे नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याबाबतची नोंद करण्यात आली आहे.

नितीन गायकवाड हा मोहोळ येथील एसटी स्टॅन्डमधील पेपर विक्रेते सुभाष गायकवाड यांचा मुलगा असून महाराष्ट्रासह अन्य राज्यामध्ये व्हॉलीबॉल व क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याने नावलौकीक मिळविला होता . त्याच्या पश्चात आई, वडी , पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT