NCP SAKAL
पुणे

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते यांचा सासवडला दोन लाखांची मोफत पुस्तक वितरण

विरोधी पक्षनेतेपदातून मुख्यमंत्रीपदाचा मार्ग.. त्यामुळे अजितदादा पवारांना लवकरच संधी

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेते अजितदादा पवार चारवेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही. ते काही महिन्यांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यावर मी त्यांचे अभिनंदन केले. कारण मुख्यमंत्रीपदाचा मार्ग हा विरोधी पक्षनेतेपदातून जातो, अशी कित्येक उदाहरणे आहेत. त्यामुळे आता हा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अजितदादांना सापडला आहे., असा विश्वास व भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्य कृषी परीषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केला.

सासवड (ता.पुरंदर) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात आज (ता.6) पुरंदर पब्लिसीटीतर्फे विजय कोलते यांनी संपादीत केलेल्या `कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे ः अजितदादा पवार` या प्रतनिहाय हजार रुपये किंमतीच्या 200

काॅफीटेबल बुकचे मोफत वितरण.. विविध विद्यालये, महाविद्यालये, ग्रंथालये, वाचनालये, विविध कार्यालये, विविध संस्था, मंडळे, विविध व्यक्ती यांना करण्यात आले. तसेच महाराष्ट्र साहित्य परीषद शाखा सासवडच्या वतीने विजय कोलते यांचा वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा झाला. त्यावेळी श्री. कोलते कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, पं.स.चे माजी सभापती अतुल म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सुनिता कोलते, शिवसेना (ठाकरे) तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष डाॅ. राजेश दळवी, भाजपचे शहराध्यक्ष साकेत जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, संजय चव्हाण, अत्रे प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, सहसचिव बंडुकाका जगताप, गौरव कोलते, डाॅ. अरुण कोळेकर, अॅड.प्रकाश खाडे, प्राचार्य धनाजी नागणे, अॅड. दिलीप निरगुडे, शिवाजी घोगरे, डाॅ. विनायक खाडे, शांतारामबापू कोलते, श्रीरंग वाईकर, माऊली मेमाणे, दादा मुळीक, ईश्वर बागमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अत्रे प्रतिष्ठानतर्फे राजगौरी जाधव व कैवल्य निरगुडे यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश श्री. कोलते यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

टेकवडे म्हणाले., अजितदादा पवार यांच्यावर इतके चांगले पुस्तक निर्माण करुन श्री.कोलते यांनी नेत्यावरची श्रद्धा प्रकट केली आहे. कोलते हे कोणलाही अंगावर घेत नाही व कोणाशीही दुश्मनी करीत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या पक्ष व नेत्यावर श्रद्धा असताना त्यांना शुभेच्छा द्यायला इतर पक्षीय सारे हजर आहेत. हा त्यांचा सर्वसमावेशकचा गुणच आहे. माजी सभापती म्हस्के म्हणाले., माझे प्रेम माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर आहे, तेवढेच याही विजयरावांवर आहे. कारण, मला साहित्याची आवड आहे आणि त्यांनाही आहे. अत्रे समजून घ्यायचे असतील, कोलतेंच्या सानिध्यात चार दिवस घालवा. यानिमित्ताने अॅड. दिलीप निरगुडे, डाॅ.राजेश दळवी, अभिजीत जगताप, साकेत जगताप, अॅड. प्रकाश खाडे आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मुळीक यांनी केले. तर सूत्रसंचालन सचिन घनवट यांनी केले. आभार प्रदर्शन बंडुकाका जगताप यांनी केले.

``शिर्डी (जि.नगर) येथील राष्ट्रवादी काग्रेसच्या शिबीरात विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. परंतु, दुसऱया दिवशी शिबीरात ते न दिसल्याने ते नाराज असल्याबाबत समाजमाध्यमांवर व काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे चुकीचे आहे. अजितदादा नाराज नाहीत. त्यांची तब्येत ठिक नसल्याने ते दुसऱया दिवशी नव्हते. जर अगोदर जाहीर केले असते, तर काही कार्यकर्ते निघून गेले असते. म्हणून त्यांनी तसे जाहीर केले नव्हते.``

- विजय कोलते, प्रवक्ते ः राष्ट्रवादी काँग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT