pune news  sakal
पुणे

Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

बारामतीच्या दहीहंडीचा नावलौकीक राज्यभर आहे. येथील संघ बाहेर गावी जाऊन दहीहंडी फोडतात तर बारामतीच्या दहीहंडी मंडळांच्या हंडी फोडण्यासाठी चुरस असते.

मिलिंद संगई, बारामती

बारामती - यंदाही बारामतीकरांनी दहीहंडीचा थरार अनुभवला. गोविंदाचा उत्साह व डीजेच्या तालावर नृत्य करत युवकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली.

बारामती व दहीहंडी हे अतूट समीकरण आहे. बारामतीच्या दहीहंडीचा नावलौकीक राज्यभर आहे. येथील संघ बाहेर गावी जाऊन दहीहंडी फोडतात तर बारामतीच्या दहीहंडी मंडळांच्या हंडी फोडण्यासाठी चुरस असते.

यंदा शुक्रवारी (ता. 8) दहीहंडी साठी लागणारे मानवी मनोरे पाहण्यासाठी आबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. सुभाष चौकात माजी नगरसेवक नीलेश इंगुले यांनी लावलेल्या युनिटी फ्रेंडस क्लबची दहीहंडी बारामतीच्याच आमराईतील योगेश जगताप दहीहंडी संघाने फोडली.

तीन हत्ती चौकातील स्व. धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टद्वारे आयोजित नगरसेवक जयसिंग बबलू देशमुख मित्र परिवाराची दहीहंडी मेखळी येथील भैरवनाथ दहीहंडी संघ अभिनव दहीहंडी संघाने सहा थर रचत लीलया फोडली. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कसब्यातील श्री काशिविश्वेश्वर दहीहंडी मंडळाची दहीहंडी काशिविश्वेश्वर संघाने फोडली. अशोकनगर चौकातील अँड. विनोद जावळे यांच्या राज प्रतिष्ठानची दहीहंडी गुनवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने पाच थर रचून फोडली. यावेळी मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख संघटक वसंत मोरे, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांच्या एकलव्य चषक दहीहंडी संघाची दहीहंडी शिवछत्रपती संघाने सहा थर रचून फोडली. सिनेअभिनेते प्रविण तरडे, गोल्डमॅन मितेश धुळे, मनसे नेते दिलीप धोत्रे उपस्थित होते.

क्रांतीसिंह विश्वनाथ दादा गालिंदे चौकातील दहीहंडी गुणवडीतील जय मल्हार दहिहंडी संघाने फोडली. माजी नगरसेवक संतोष गालिंदे, विकास गालिंदे, केतन गालिंदे, श्रीनिवास गालिंदे आदी उपस्थित होते.

भिगवण चौकातील ऋतुराज काळे यांच्या वस्ताद बाजीराव काळे दहीहंडी मेखळीच्या भैरवनाथ दहीहंडी संघाने फोडली. या प्रसंगी किरण गुजर, सुधीर पानसरे, शुभम ठोंबरे, बाळासाहेब जाधव, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे उपस्थित होते.

माजी नगरसेवक अभिजीत काळे यांच्या अजितदादा युवा शक्ती दहीहंडी मंडळाची दहीहंडी गोखळी (ता. फलटण) येथील जय हनुमान संघाने फोडली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, विश्वास देवकाते, सिद्धनाथ भोकरे उपस्थित होते. अॅड. वैभव काळे, ओंकार पवार, शैलेश भोसले, ऋषिकेश काळे, सचिन खरात, कुमार भोसले, आदिनाथ नागोल, गणेश देवकाते यांनी नियोजन केले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोइटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे व प्रभाकर मोरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT