पुणे

नाभिकांनी दुकाने बंद ठेवून केला मुख्यमंत्र्यांचा निषेध

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आंदर मावळातील सर्व नाभिक बांधवांनी दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्री महोदयांचा निषेध व्यक्त केला आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथे एका जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर अर्धवट विकासाचा खापर फोडत त्याला नाभिक समाजाच्या रोजगाराशी जोडले होते, या निषेधार्थ सर्व नाभिक समाजात एकवटला आहे. फडणवीस काढलेल्या अवमानकारक वक्तव्य नाभिक  समाजाच्या जिव्हारी लागले असून समाज बांधवानी स्वतःहून कडकडीत दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. 
आंदर मावळात दर पाच किलोमीटर अंतरावर समाजातील नाभिक  बांधवाची दुकाने आहे,तेच त्यांचे रोजगाराचे मुख्य साधन आहे.ऐरव्ही सोमवारी नाभिक बांधवाची दुकाने बंद असतात. त्यात आजही दुकाने बंद ठेवल्याने रोजगार ही बुडाला आणि नागरिकांची गैरसोय झाली.

हे रयतेचे राज्य आहे, रयतेला सन्मानपूर्वक वागणूक देऊ,सुराज्य निर्माणाची  वल्गना करणाऱ्या या सरकारच्या प्रमुखांनी असे बोलणे अपेक्षित नाही. मुख्यमंत्रीपदावर असताना विशिष्ठ समाजाबद्दल बोलताना जबाबदारीचे भान ठेवून बोलावे, अल्पसंख्याक समाजाला या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी हिणवल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे सदस्य  माऊली आढाव यांनी केला. 
संतोष क्षीरसागर म्हणाले, "मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याने खूप दु:ख झाले, समान नागरी कायदा आणू पाहणारे मनातून मात्र असे असुंकुचित आहे, हे पाहून वेदना झाल्या.दादाभाऊ शिंदे, पप्पू क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, गणेश क्षीरसागर यांच्या सह परिसरातील सर्वानी या निषेधार्थ सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT