पुणे

गुणांकन पद्धतीद्वारे नवउद्योजकांना प्रोत्साहन 

संतोष शाळिग्राम

नवे व्यवसाय वा स्टार्टअपसाठी तुम्ही कसा कर्जपुरवठा उपलब्ध करून देता? 
- स्टॅंडअप इंडिया आणि मुद्रा अशा दोन योजनांद्वारे स्टार्टअप, छोटे व्यवसाय, उद्योग, सेवा व्यवसाय यासाठी कर्जपुरवठा केला जातो. स्टॅंडअप इंडियामध्ये केवळ अनुसूचित जाती, जमाती आणि कोणत्याही गटातील महिलांसाठी दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. मुद्रा सर्वांसाठी आहे. कर्ज मात्र दहा लाखांपर्यंत मिळते. 

आपल्या कर्जमर्यादेपेक्षा मोठा उद्योग वा व्यवसाय असेल, तर त्यासाठी कोणती योजना आहे? 
- दोन कोटी रुपयांपर्यंत कर्जासाठी "क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर एमएसई' ही सर्वांसाठी योजना आहे. लघू आणि मध्यम आकाराच्या उद्योग-व्यवसायासाठी याद्वारे कर्ज दिले जाते. त्यासाठी तारणाची गरज नाही. यात ट्रेडिंगला मात्र कर्जपुरवठा केला जात नाही. उद्योग, व्यवसायाचा चांगला प्रस्ताव असेल, तर कुणालाही कर्ज मिळू शकते. 

स्टार्टअप वा व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करता? 
- नवउद्योजकाने कर्ज घेऊन त्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर दरवर्षी आम्ही त्यांना गुणांकन देतो. यात उद्योग-व्यवसायाची प्रगती, ताळेबंदपत्रक, कर्जाची परतफेड आदी पाहिले जाते. चांगले गुणांकन मिळविणारांना आम्ही व्याजदर कमी करतो. यातून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. 

कर्जपुरवठ्याबाबत मार्गदर्शनासाठी कोणती व्यवस्था वा सुविधा आहेत? 
- बॅंकेच्या कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय व्यवस्था आहे. त्यामुळे दोन ते तीन आठवड्यांत कर्जमंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. याशिवाय स्टार्टअप वा अन्य कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे कशी करावीत, याबाबत बॅंकेत मार्गदर्शनही केले जाते. कर्ज प्रकरण व्यवहार्य नसेल, तर आवश्‍यक त्या कारणांसह अर्जदारास तत्काळ कळविण्याचीदेखील व्यवस्था असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT