पुणे

‘नेट’ परीक्षेच्या पात्रता निकषांमध्ये बदल

सकाळवृत्तसेवा

पुणे - सहायक प्राध्यापक नियुक्तीसाठी आवश्‍यक राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) पात्रता निकषांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने बदल केल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘सेट’साठी ते निकष लागू केले आहेत. यामुळे पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ दुपटीने वाढणार आहे.

‘नेट’मध्ये उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांमधून १५ टक्के विद्यार्थी पात्र ठरविले जात होते. आता मात्र परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सहा टक्के विद्यार्थी पात्र ठरविले जाणार आहेत. हे विद्यार्थी त्यांच्या वैधानिक आरक्षणाच्या टक्केवारीनुसारदेखील पात्र ठरविण्यात येतील. केरळमधील उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने नव्या पात्रता निकषांसंबंधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पत्र पाठविल्याने हे निकष राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) देखील लागू असतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. परीक्षेत ३६ हजार विद्यार्थी पात्र ठरले, असे मानल्यास इतर मागासवर्गीय २७ टक्के, अनुसूचित जातींसाठी १५ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७.५ टक्के, अपंगांसाठी ३ टक्के आणि खुल्या संवर्गासाठी ४७.५० टक्के विद्यार्थी पात्र ठरतील. संवर्गांच्या या टक्केवारीनुसार पात्र विद्यार्थ्यांची विभागणी होईल. 
राज्य पात्रता परीक्षेसाठीदेखील हाच नियम लागू होणार आहे. मात्र, राज्यात खुला गट, अनुसूचित जाती-जमाती, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग असे संवर्ग आहेत. राज्याच्या धोरणाप्रमाणे या सर्वांना दिलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार सेट परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची विभागणी होईल. विद्यार्थ्यांना पात्र ठरण्यासाठी परीक्षेतील तीनही पेपरमध्ये सरासरी ४० टक्के गुण मिळविणे आवश्‍यक आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकष ३५ टक्के आहे. 

विद्यार्थ्यांना दिलासा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १६ एप्रिल रोजी ‘सेट’ परीक्षा घेतली होती. त्यासाठी ६९ हजार १८६ विद्यार्थी बसले होते. यात १६ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण (इलिजिबल) झाले. यातून जुन्या १५ टक्के पात्रता निकषानुसार दोन हजार ७११ विद्यार्थी पात्र ठरले होते. सेटची पुढील परीक्षा देणाऱ्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी या परीक्षेप्रमाणेच गृहीत धरल्यास नव्या सहा टक्के निकषानुसार चार हजार ५१ विद्यार्थी पात्र ठरतील. म्हणजे पात्र विद्यार्थ्यांची संख्या साधारणपणे दुपटीने वाढेल, असा अंदाज विद्यापीठाच्या सेट विभागाने वर्तविला आहे.

सेट फेब्रुवारी महिन्यात
राष्ट्रीय पात्रता परीक्षा पाच नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याची सविस्तर माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाणारी ‘सेट’ परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT