शोरूमपुढे उभ्या असलेल्या विविध रंगातील ई-बाईक.
शोरूमपुढे उभ्या असलेल्या विविध रंगातील ई-बाईक. 
पुणे

इंधन दरवाढीमुळे ई-बाईकची ‘धूम’

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर - पेट्रोल दरवाढीने त्रस्त झालेल्यांनी आता आपला मोर्चा इंधनविरहित ई-बाईककडे वळवल्याचे चित्र असून, गेल्या दोन महिन्यांत एकट्या पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत तब्बल १५०० ई-बाईकची विक्री झाली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीला पर्याय म्हणून तसेच पेट्रोलवरील सर्व दुचाकींना आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात तब्बल आठ स्वदेशी कंपन्यांनी आपल्या इलेक्‍ट्रिक-दुचाकी  बाजारात उतरवल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-बाईक विरुद्ध ई-बाईक असे विक्रीयुद्ध पाहायला मिळणार हे नक्की. 

सन २०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात सत्तापालट होण्यात इंधन दरवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. मात्र गेली तीन वर्षांत फारसे आशादायक असे काही न घडता उलट तीन वर्षांत सर्वाधिक म्हणजे ८० रुपयांचा पल्ला पेट्रोलने गाठला. पर्यायाने सर्वसामान्य वाहनचालक इंधन खर्चाला पर्याय शोधत असतानाच तब्बल आठ कंपन्या दसरा-दिवाळीच्या तोंडावर ई-बाईक (इलेक्‍ट्रिक बाईक) घेऊन पुणे शहर-जिल्ह्याच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. यात तुनवाल इलेक्‍ट्रॉनिक्‍स, लोहिया ॲटो, अजंता, अँपेरेर, एव्होन, क्रीस, ओकिनावा, हिरो आदी कंपन्यांनी आपापली विविध प्रकारची दुचाकी मॉडेल्स बाजारात उतरवल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकार मनोहर काळभोर केडगाव (ता. दौंड) यांनी दिली. 

‘‘सध्या २६ व २८ अँपिअरच्या १२ व्होल्टच्या बॅटऱ्या तुनवाल ई-बाईकमध्ये वापरल्या असून, त्या एक वर्षात पूर्ण बदलून देण्याची ग्वाही आम्ही देत असल्याने ग्राहकांचा कल ई-बाईककडे चांगला आहे. गेल्या दोन महिन्यांत आम्ही ७५० गाड्यांची विक्री केली असून, २०० किलोपर्यंत वजन चढालाही वाहून नेण्याच्या क्षमतेने गाड्यांची मागणी जिल्ह्यात मोठी आहे. पर्यायाने आम्हाला जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत एकाच महिन्यात १९ डीलर्स नेमण्याशिवाय पर्याय राहिला नाही,’’ अशी माहिती केडगाव येथील वाहन विक्रेते गोविंद खोडवे यांनी दिली. 

ना लायसेन्स ना रजिस्ट्रेशन 
इंधन आणि आवाज दोन्हींचे प्रदूषण नसलेली ही गाडी चालविण्यासाठी लायसेन्सची आणि आरटीओच्या नोंदणीचीही गरज नसल्याचे प्रमाणपत्र ॲटोमोबाईल रिसर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूट (आयआरएआय)कडून तुनवाल ई-बाईकसाठी आमच्याकडे आहे. पर्यायाने शेतकरी, महिला, विद्यार्थी आदींना आकर्षित करीत असल्याचे गोविंद खोडवे यांनी सांगितले. 

पाच रुपयांत ७० किलोमीटर!
सध्याच्या आघाडीच्या सर्व पेट्रोल दुचाकी वाहनांसारखाच लुक, ट्यूबलेस टायर, चांगले सस्पेंशन, डिस्क ब्रेक, डिजिटल स्पीड मीटर, रिमोट कंट्रोल, ट्रीप सिस्टिम अशा सर्व अत्याधुनिक सुविधा या ई-बाईकमध्ये उपलब्ध असून, केवळ ५ रुपयांत ७० किलोमीटर गाडी जात असल्याचा दावा या कंपन्या करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT