पोलिसांनी शिंदेवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला sakal
पुणे

Pune News : किराणा माल दुकानदारावर पडला छापा ; चक्क 65 लाख रुपयांचा गुटखा जप्त

श्रीरामनगर येथील एका दुकान व्यवसायिक बेकायदा गुटख्याची विक्री करत

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : राजगड पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे श्रीरामनगर (ता.हवेली) आणि शिंदेवाडी (ता.भोर) येथील गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे 65 लाख 19 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी रमेश मोतीलाल चौधरी (वय 37, रा. श्रीरामनगर, ता.हवेली) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. श्रीरामनगर येथील एका दुकान व्यवसायिक बेकायदा गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे श्रीरामनगर येथील किराणा दुकान व्यावसायिकाच्या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी तेथे विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू याचे बॉक्स आणि पोती आढळून आली.

यावेळी संबंधित दुकानदाराकडे सखोल चौकशी केली असता त्याचे शिंदेवाडी येथे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिंदेवाडी येथील गोडाऊनवर छापा टाकला असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली.

पोलिसांनी दोन्ही गोडाऊनमधील सुमारे 65 लाख 19 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी रमेश चौधरी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलिस हवलदार संतोष तोडकर, राहुल कोल्हे, महादेव शेलार, सागर गायकवाड, अजित भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT