Pune News 
पुणे

Pune News : कंटेनरवरून जॉब घसरून पडला! पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्टॅंडजवळ सोमवारी पहाटे कंटेनरवरून अवजड जॉब घसरून भर रस्त्यात पडला. त्यामुळे या महामार्गावर खडकी, शिवाजीनगर आणि येरवड्यापर्यंत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. मेट्रोच्या कंटेनरवरून २७ टनी जॉब (मोठा लोखंडी बॉक्स) घसरून भर रस्त्यात पडला. त्यामुळे सकाळपासूनच खडकी आणि पिंपरी चिंचवड येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतूक पोलिसांनी एका लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू केली. वाहतूक पोलिसांनी अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला केला. परंतु पुन्हा कंटेनर बाजूला काढण्यासाठी आलेले तीन क्रेनही रस्त्यावरच होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत खडकी बाजार येथून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बाजूने शिवाजीनगर, संगम पूल, हॅरिस ब्रिज आणि येरवड्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

कंटेनर दूर करण्यासाठी तीन क्रेन

कंटेनरवरील जॉब २७ टनांचा असल्यामुळे वाहतूक पोलिसांना कंटेनर बाजूला करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. टाटा मेट्रोच्या हायड्रो क्रेनने कंटेनरवरून घसरलेला जॉब उचलला. दुसऱ्या क्रेनने बाजूला सरकावले. अखेर तिसऱ्या क्रेनने बराच वेळाच्या प्रयत्नानंतर कंटेनर बाजूला करण्यात आला.

त्यात सायंकाळी पाऊस पडल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह शिवाजीनगर, खडकी आणि येरवडा वाहतूक पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT