श्री येमाई देवी  
पुणे

कवठे येमाई येथील श्री येमाईदेवी कुलदैवत

युनूस तांबोळी

नवरात्र उत्सव आजपासून (गूरूवार) सुरू होत आहे. देवीजवळ घटस्थापना करून कुलदैवतांचा जागर केला जाणार आहे. नवचंडिकेचे नऊ दिवस उपवास करून देवीची आराधना केली जाते. देवाच्या रूपाची महती आणि स्तुती करताना रणचंडिकेने दैत्याला मारल्याच्या कथा गोंधळी कलावंत रात्र-रात्र जागून ऐकवीत असतात. हा तर लोककलेचाच उत्सव मानला जातो. त्याविषयी माहिती...

शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री येमाईदेवी कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. गावापासून तीन किलोमिटर अंतरावर हे देवीचे मंदीर आहे. मंदिराभोवती झाडे लावल्याने येथील परीसर निर्सगरम्य बनला आहे. मंदिराच्या बाहेर जुन्या काळातील बारव आहे. मंदीराचा जिर्णोद्धार करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिरात भावीक दर्शनासाठी येत असतात. संगमनेर, बिड, नगर तसेच पुणे परीसरातून भावीक मुक्कामी राहण्यास येत असतात. यासाठी येथे बैठ्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. नवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. भावीक येथे पहाटे पायी चालत येऊन दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. जागरण गोंधळ, भजन, प्रवचन करून येथे हा उत्साह मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. गुरूवारी (ता. 2) होमहवनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी या उत्सवाची तयारी झाली असून, मंदिरावर विद्युत रोषणाई व सभोतालची स्वच्छता करण्यात आली आहे. येथे गोंधळी, भेदिक अशा जुन्या कचे दर्शन घडते. शैक्षणीक सहली या दरम्यान येथे येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT