Maratha Kranti Morcha 
पुणे

पुण्यात 'मूक' मोर्चाची 'घोषणामय' रॅली !

स्वप्नील जोगी

पुणे : कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी अशा विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात निघालेल्या विविध मराठा क्रांती मूक मोर्चांच्याच पार्श्‍वभूमीवर येत्या 9 ऑगस्टला मुंबई येथे होऊ घातलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी पुण्यात रविवारी दुचाक्‍यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. फरक फक्त एवढाच की, मोर्चांप्रमाणे ही रॅली "मूक' नव्हती; तर रॅलीदरम्यान अनेकदा मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. 

"जय भवानी, जय शिवाजी,' "एक मराठा, लाख मराठा' अशा विविध घोषणा देत सुमारे चार-पाचशे दुचाकीस्वार सकाळी 11 च्या सुमारास मार्केटयार्ड (गुलटेकडी) येथून निघाले आणि पुढे विविध ठिकाणी त्यांना इतर दुचाकीस्वार येऊन मिळत असल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण रॅलीत मिळून सुमारे 2 हजार दुचाक्‍यांवरून तीन ते चार हजार जण सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तरुणी आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती. रॅलीत सहभागी जणांनी हातांत शिवरायांची रेखाचित्र असलेले भगवे झेंडे घेतले होते. तसेच अनेकांनी भगव्या टोप्याही परिधान केल्या होत्या. 

रॅलीच्या सोबत पोलिसांच्या जीप आणि एक व्हॅन सुद्धा पाहायला मिळाली. शिवाय, सोबतीने एक रुग्णवाहिका देखील होती. शहरात ठिकठिकाणी पोलिस आणि वाहतूक पोलिसांची चोख व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे एखाददोन ठिकाणे सोडता फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात (डेक्कन) दुपारी दीड वाजता रॅलीची सांगता झाली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT