wedding bridegroom gets angry the dagger was directly inserted into the heart 
पुणे

Pune Wedding Crime: लग्नाच्या दिवशीच नवरदेवाला राग अनावर; क्षुल्लक कारणावरुन थेट कट्यार काळजात घुसवली

शहरात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट एका व्यक्तीच्या काळजात कट्यार घुसवल्याचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून विवाह समारंभात वराने मंगल कार्यालय चालकावर कट्यारने वार केला.

कार्तिक पुजारी

पुणे- शहरात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट एका व्यक्तीच्या काळजात कट्यार घुसवल्याचा प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून विवाह समारंभात वराने मंगल कार्यालय चालकावर कट्यारने वार केला. त्यामुळे विवाहाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मंगल कार्यालयात घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता. (Pune News On the day of the wedding bridegroom gets angry the dagger was directly inserted into the heart)

विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडे असणाऱ्या कट्यारने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT