PMRDA
PMRDA 
पुणे

‘पीएमआरडीए’ला सर्व धरणांतून पाणी

सकाळवृत्तसेवा

पुण्याचे पाणी कमी करून नाही, तर त्यात बचत करून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यातही फक्त खडकवासला प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणार नसून, त्या त्या भागातील जलाशयांमधूनही तो केला जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या बैठकीत स्पष्ट केले. 

‘पीएमआरडीए’ला तीन दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कालवा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘महापालिका हद्दीच्या पुढे पाच किलोमीटरपर्यंत पाणी देण्याची जबाबदारी सरकारनेच महापालिकेवर टाकली आहे. पुणे वेगाने वाढत आहे. शहराच्या आजूबाजूलाही त्याची वाढ होत आहे. तेथे मोठे गृहनिर्माण प्रकल्प झाले आहेत. सदनिका बांधून तयार आहेत. पण, तेथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी तेथील नागरिकांना पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे पीएमआरडीएच्या सात हजार चौरस किलोमीटर परिसरात पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करावे लागेल. हे नियोजन करताना फक्त खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जाणार नाही; तर तो पीएमआरडीएच्या त्या त्या भागातील जलाशयांमधून केला जाईल.’’

करावयाचे उपाय
 पाणीसाठा कसा वाढेल
 तलावातील गाळ काढणे
 कालव्यांची दुरुस्ती करणे
 बंद नळातून पाणीपुरवठा करणे
 पुरवठ्याची क्षमता वाढविणे
 साठवण क्षमता वाढविणे

पाणी नियोजनासाठी निधी
पीएमआरडीएने पाण्याचे स्रोत निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी स्वखर्चाने त्याचा आराखडा तयार करावा, अशी सूचनाही बापट यांनी दिली. या आराखड्यामुळे पुणे महापालिकेवरचा भारदेखील कमी होईल. तसेच, पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात पाण्याच्या नियोजनासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT