पुणे

...आणि "पोलिसकाका' धावून आले 

सकाळवृत्तसेवा

येरवडा - इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी चंदननगर येथून सहा आसनी रिक्षाने शाळेत निघाली होती. रिक्षात जागा नसल्यामुळे चालकाने विद्यार्थिनीला शेजारी बसण्यास सांगितले. प्रवासादरम्यान त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने शाळेत आल्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने येरवडा पोलिस ठाण्यात संपर्क करताच "पोलिसकाका' तिच्या मदतीला धावून आले. 

पीडित मुलगी येरवड्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. नेहमी तिचे पालक तिला शाळेत सोडतात. मात्र बुधवारी सकाळी ती एकटी सहा आसनी रिक्षाने शाळेला जाण्यासाठी निघाली होती. रिक्षात बसण्यास जागा नसल्याने चालक राहुल विजयकुमार वाघमारे (रा. आनंद पार्क, वडगावशेरी) याने तिला पुढे येऊन शेजारी बसण्यास सांगितले. प्रवासादरम्यान तिची विचारपूस करत अश्‍लील चाळे केले. एवढेच नाही तर तिला परत दुपारी तीन वाजता शास्त्रीनगर चौकात येऊन थांब तुला घेण्यासाठी येतो, असे सांगितले. पीडित विद्यार्थिनीने मैत्रिणीच्या मदतीने शाळेत लावलेल्या येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिसकाकांच्या मोबाईलवर संपर्क केला. 

पोलिस निरीक्षक (गुन्हे) अशोक कदम यांनी सांगितले, की आरोपी वाघमारे याच्या विरुद्ध विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्‍सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, संबंधित गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तेथे वर्ग केला आहे.'' आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक गेल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT